बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर नुकतेच त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आल्या होत्या. या शोमध्ये त्या दोघींनी होस्ट कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत खूप मस्ती केली. या शोमध्ये त्यांनी त्यांचे पती आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबाबत अनेक गप्पा मारल्या आणि त्यांच्याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला.
नीतू कपूर यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये ऋषी यांच्या ट्वीटबाबत खूप गप्पा मारल्या. ऋषी कपूर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. ते अनेकवेळा सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर त्यांचे मत व्यक्त करत असायचे. ऋषी कपूर यांना सोशल मीडियावर नेहमीच मुक्तपणे त्यांचे मत व्यक्त केल्यामुळे अनेकवेळा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. (Neetu Kapoor reveals in the kapil sharma show when a crowd of angry people’s on rishi kapoor against his tweet)
नीतू कपूर यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये ऋषी कपूर यांच्या एका ट्वीटबद्दल सांगितले. ज्यानंतर लोक त्यांच्यावर खूप भडकले होते. एवढंच काय तर त्यांनी ऋषी कपूर यांच्या घराबाहेर मोर्चा काढून घोषणाबाजी चालू केली होती. नीतू कपूर यांनी सांगितले की, ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा त्यांच्या घरी रेनोवेटचे काम चालू होते. त्यामुळे ते सगळे दुसऱ्या घरी राहत होते. परंतु जेव्हा त्या त्यांच्या कृष्णा कुंज या बंगल्यावर आल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की, अनेक लोक त्यांच्या घराबाहेर त्यांच्या पतीविरुद्ध घोषणा करत होते.
नीतू कपूर यांनी सांगितले की, “त्यावेळी जवळपास ३०० लोक रस्त्यावर उभे राहून ‘ऋषी कपूर हाय हाय’ असे बोलत होते, तेव्हा मी म्हणाले की, हे सगळे काय चालले आहे. मी खूप घाबरले होते. त्यावेळी एक पोलीस अधिकारी माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितले की, ऋषी कपूर यांना सांगा की, ट्विटरवर जास्त काही चर्चा करू नका. हे ऐकून मला खूप राग आला होता. आणि मी त्यांना म्हणाले की, माझ्यासोबत चला. मग त्यांना (ऋषी कपूर) सांगा हे सगळं काय चाललंय. त्यांना समजलं पाहिजे, तेव्हाच हे सगळं बंद होईल.”
नीतू कपूर यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घरी पोहोचले, तेव्हा पाहिले की, ऋषी कपूर टीव्ही बघत होते. मी त्यांना म्हणाले की, यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. यावर ऋषी कपूर म्हणाले की, हिम्मत पाहिजे सर.” त्यानंतर तीन दिवसांनंतर नीतू कपूर यांना त्यांच्या घराबाहेर एक पोलीस अधिकारी भेटले आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्वीट्सबाबत कमी चर्चा केली.
यासोबत नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ दोन अभिनेत्यांनी ‘नायक’ला होकार दिला असता, तर अनिल कपूरांचा झाला असता पत्ता कट
-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच
-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट