Wednesday, December 6, 2023

‘या’ दोन अभिनेत्यांनी ‘नायक’ला होकार दिला असता, तर अनिल कपूरांचा झाला असता पत्ता कट

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा चित्रपट ‘नायक’ 7 सप्टेंबर, 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आठवते की, अनिल जेव्हा एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले होते. जेव्हा-मजेव्हा अनिल स्क्रीनवर आले, थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्टी वाजवून त्यांचे स्वागत केले आहे. अनिल यांच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नायक’ चित्रपटात त्यांनी स्वतः काम मागून घेतले होते.

जेव्हा एस शंकर यांनी ‘नायक’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुख्य अभिनेता म्हणून त्यांची पहिली पसंती आमिर खान किंवा शाहरुख खान होती. माध्यमांशी बोलताना स्वतः अनिल कपूर यांनी एकदा सांगितले की, “जेव्हा या दोन्ही कलाकारांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता, तेव्हा मला याबद्दल कळले, तेव्हा मी स्वतः एस शंकरकडे काम मागण्यासाठी गेलो होतो. मला आनंद आहे की, मी हा चित्रपट करू शकलो.”

अनिल कपूर यांना कल्पना होती की, या चित्रपटाची कथा सामान्य लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी होईल, पण चित्रपटाला एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळेल याची त्यांना कल्पना नव्हती. 20 वर्षांपूर्वी जेव्हा ‘नायक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, नंतर त्याला ‘कल्ट फिल्म’चा दर्जा मिळाला.

अनिल कपूर यांनी ‘नायक’मध्ये टीव्ही पत्रकार शिवाजी रावची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमरीश पुरी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत होते. शिवाजीला एके दिवशी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळते. मुलाखतीदरम्यान तीक्ष्ण प्रश्नांमध्ये वादविवाद होतो. प्रकरण इतके वाढते की, अमरीश पुरी त्यांना एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याचे आणि सत्ता स्वीकारण्याचे आव्हान देतात. ते या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटातील अनिल कपूरच्या प्रत्येक ऍक्शनला प्रेक्षक स्वतःशी संबंध जोडून खुश होतात.

अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांच्याशिवाय या चित्रपटात राणी मुखर्जी, जॉनी लीव्हर, पूजा बत्रा, परेश रावल, सौरभ शुक्ला यांसारखे दिग्गज कलाकार देखील होते. चित्रपटाचे संगीतही जबरदस्त होते. ज्याचे दिग्दर्शन ए. आर. रहमान यांनी केले होते.(actor anil kapoor starrer film nayak completes 20 years of release)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सुरुवातीला राज कपूरांच्या गॅरेजमध्ये काढले दिवस, गर्लफ्रेंड असतानाही सुनीता उचलायची अनिल कपूरचा संपूर्ण खर्च

‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

हे देखील वाचा