Monday, March 30, 2026
Home हॉलीवूड काय सांगता! निर्माता क्रिस्टोफर नोलन आणि वॉर्नर ब्रदर्सची साथ संपुष्टात, सिनेमा प्रदर्शनावरून मतभेद

काय सांगता! निर्माता क्रिस्टोफर नोलन आणि वॉर्नर ब्रदर्सची साथ संपुष्टात, सिनेमा प्रदर्शनावरून मतभेद

क्रिस्टोफर नोलन हे जगप्रसिद्ध नाव आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते असलेले क्रिस्टोफर हे संपूर्ण जगातील लोकप्रिय निर्माते आहे. सध्याच्या युगातील चित्रपट निर्मात्यांमध्ये जॅक स्नायडर आणि क्रिस्टोफर नोलन ही एकमेव अशी नावे आहेत ज्यांचे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आवडतात. क्रिस्टोफरचा मागील चित्रपट ‘टेनेट’ हा कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाने केवळ अमेरिकेत ४३० कोटी रुपयांची कमाई केली. हा तोच चित्रपट आहे ज्यात शूटिंग दरम्यान ऍक्शन सीन चित्रीत करत असताना क्रिस्टोफरने एक खरेखुरे जहाज उडवले होते.

आता त्याने त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याचा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एकावर आधारित असेल. क्रिस्टोफरचा भूतकाळ आणि या नवीन चित्रपटाच्या विषयाबद्दल सोशल मीडियावर बरेच मीम्स बनू लागले आहेत.

सोशल मीडियावर एक मीम सध्या खूप व्हायरल होत आहे. या मीम्समध्ये, क्रिस्टोफर नोलनच्या फोटोच्या खाली लिहिले आहेे की , “मी पुढील चित्रपटात अणुबॉम्बचा स्फोट करणार आहे.” त्याचबरोबर त्यासोबत एका दर्शकाचे फोटो आहे आणि त्याच्या खाली प्रश्न लिहिला आहे की, “संगणक ग्राफिक्स प्रतिमा, बरोबर?” तर पुढील फोटोत क्रिस्टोफर शांत आहे आणि दर्शकाचा चेहरा उतरत आहे. या प्रश्नासह, “बरोबर?” मीम्स हा विषय कोणत्याही लोकप्रियतेचा पहिला उपाय मानला जातो. क्रिस्टोफर नोलनचा पुढचा चित्रपट आधीच तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, ‘इन्सेप्शन’, ‘द डार्क नाइट’, ‘इंटरस्टेलर’, ‘टेनेट’ यांसारख्या चित्रपटांचे निर्माते क्रिस्टोफर नोलन यांचा पुढील चित्रपट जे. रॉबर्ट ओपेनहाइमरवर आधारित आहे. ओपेनहाइमरची गणना दुसऱ्या महायुद्धात विकसित झालेल्या अणुबॉम्बच्या शोधकांमध्ये केली जाते. या चित्रपटासंदर्भात काही हॉलीवूड चित्रपट निर्मिती कंपन्यांशी चर्चा सुरू झाल्यानंतरच ही गोष्ट समोर आली आहे.

असे म्हटले जाते की, क्रिस्टोफर नोलनला त्याचा पुढचा चित्रपट त्याच्या वॉर्नर ब्रदर्सशिवाय इतर एका स्टुडिओसह करायचा आहे. जेव्हा वॉर्नर ब्रदर्सने त्याचे सर्व चित्रपट थिएटर आणि ओटीटीवर एकाच वेळी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ही गोष्ट क्रिस्टोफरला अजिबात आवडली नव्हती. क्रिस्टोफरचे असे मत आहे की, चित्रपटाचा खरा अनुभव हा सिनेमाघरातच येतो. त्याने आतापर्यंत डिजिटल कॅमेऱ्यांऐवजी पारंपारिक रील कॅमेऱ्यांवर आपले चित्रपट शूट केले आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, क्रिस्टोफर नोलनच्या टीममधील लोकांनी अलीकडेच त्यांच्या पुढील चित्रपटाबद्दल किमान दोन हॉलीवूड स्टुडिओला भेट दिली आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की, नेटफ्लिक्सने देखील या चित्रपटात रस दाखवला असून, नेटफ्लिक्सने अलीकडेच संकेत दिले की, ते आपले काही चित्रपट आधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा