Monday, September 25, 2023

रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

आजच्या अभिनेत्रींनी स्वतःला कधीच कोणत्याही एका क्षेत्रासाठी बांधून ठेवले नाही. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री इतर चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसतात. बॉलिवूड आणि साऊथ या दोन सिनेसृष्टीतर कलाकारांसाठी घर आणि आंगणच झाल्या आहेत. अगदी अमिताभ, ऐश्वर्यापासून जॅकलिन आफताब शिवदासानीपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवताना दिसत आहे. हाच नियम साऊथ कलाकारांना देखील लागू असतो. ते देखील साऊथसोबत हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. अशीच एक साऊथमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अशा दोन्ही मोठ्या चित्रपटसृष्टीमध्ये काम करून नावलौकिक मिळवणारी श्रिया प्रतिभावान अभिनेत्री आहे.

बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीची सुपरहिट अभिनेत्री श्रिया सरनचा आज (११ सप्टेंबर) रोजी ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रिया एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री तसेच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य नृत्यावर प्रभुत्व मिळवलेल्या श्रियाला यासाठी अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे जन्मलेल्या श्रियाने मेहनतीने आणि चिकाटीने या मनोरंजन विश्वात खूप नाव कमावले. आज श्रिया साऊथच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

श्रियाने दिल्लीतून तिचे शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील पुष्पेंद्र सरन हे भटनागर भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) मध्ये शिक्षक होते. तर आई नीरजा सरन दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. श्रियाला चित्रपटात प्रवेश करायची खूप इच्छा होती. याच दिशेने तिने हळू हळू पाऊलं टाकायला सुरुवात करत, २००१ मध्ये बनारसमध्ये एक व्हिडिओ शूट करून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रिया बॉलिवूडच्या सुपरहिट ‘दृश्यम’ चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

श्रियाला रेणू नाथनच्या ‘थिरकाती क्यों हवा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये नृत्य करण्याची मोठी संधी मिळाली. कॅमेऱ्यासमोर श्रियाची ही पहिलीच वेळ होती. इथेच श्रियाचे नशीब चमकले आणि तिला ‘इष्टम’ या चित्रपटासाठी रामोजी फिल्म्सने करारबद्ध केले. या काळात श्रियाने एक दोन नाही तर तब्बल चार चित्रपट साईन केले.

श्रिया २००३ साली बॉलिवूड चित्रपट ‘तुझे मेरी कसम’मध्ये दिसली होती. यानंतर तिने २००४ साली ‘थोडा तुम बदलो थोडा हम’ चित्रपटात काम केले. मात्र दुर्दैवाने हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. श्रियाला खरी ओळख आणि प्रसिद्धी रजनीकांतच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्री पुरस्कारही मिळाला.

श्रिया देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचे नाव वादांशी संबंधित असायचे. ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटाच्या सिल्व्हर जुबली फंक्शनमध्ये ती लहान खोल गळा असलेला पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसली होती. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी उपस्थित होते. श्रियाच्या शॉट ड्रेसबद्दल राजकीय लोकांनी आक्षेप नोंदवले होते. यासाठी श्रियाला जाहीर माफीही मागावी लागली.

यानंतर श्रियाने तिच्या रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोश्चेव्ह सोबत गुपचूप लग्न केले. त्याच्या लग्नाला फक्त जवळचे लोक उपस्थित होते. श्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेकदा तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करते जे तिला खूप आवडतात. श्रिया जरी बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये दिसली नसली, तरी तिची लोकप्रियता आणि प्रसिद्धी कायम आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
Happy birthday Mitali | सिद्धार्थ नाही तर ‘हे’ आहे मितालीचे पहिले प्रेम, पाहा कशी पडली अभिनेत्याच्या प्रेमात
‘आदिपुरुष’नंतर प्रभास साकारणार भगवान शंकराची भूमिका, नवीन चित्रपटाची केली घोषणा
‘जवान’नंतर विजय सेतूपती पुन्हा जिंकणार प्रेक्षकांची मने, नवीन चित्रपटाचा खतरनाक पोस्टर केला शेअर

हे देखील वाचा