टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच तिच्या ‘पवित्र रिश्ता’ या शोच्या पर्व २ मध्ये दिसणार आहे. अंकिताने या शोच्या पहिल्या पर्वामध्येही काम केले होते. अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हे दोघे ‘पवित्र रिश्ता’च्या पहिल्या पर्वात दिसले होते. या शोमध्ये दोघांनी अर्चना आणि मानवची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. परंतु आता अभिनेता शाहीर शेख ‘पवित्र रिश्ता २’मध्ये सुशांत सिंग राजपूत म्हणजे मानवची भूमिका साकारणार आहे.
‘पवित्र रिश्ता २’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. या सगळ्यामध्ये आता अंकिता लोखंडेने सुशांत सिंग राजपूतबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘पवित्र रिश्ता २’च्या प्रदर्शनाच्या आधी अभिनेत्री अंकिता लोखंडेने माध्यमांना मुलाखत दिली आहे. याच दरम्यान तिने ‘पवित्र रिश्ता २’ आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत आठवणींना उजाळा दिला. यासोबतच अंकिता लोखंडेने देखील खुलासा केला आहे की, ती सुशांत सिंग राजपूतचा आवाज आठवत आहे.
अंकिता लोखंडेला विचारण्यात आले होते की, ‘पवित्र रिश्ता २’मध्ये शाहीर शेखसोबत रोमँटिक सीनला कशाप्रकारे सामोरे गेली. यावर अंकिता म्हणाली की, “असा काही विशेष नाही. एक कलाकार म्हणून मी फक्त सुशांतसोबत काम केलेले नाही. मी इतरांबरोबरही काम केले आहे. एक कलाकार म्हणून, जर कोणी मला झाडासोबतही रोमान्स करायला सांगितले, तर मी ते खूप चांगले करेन.”
अंकिता पुढे म्हणाली की, “आम्ही कलाकार आहोत, हे आमचे काम आहे. अर्थात, जेव्हा मी एखाद्याला मानव म्हणून पाहते, तेव्हा मला सुरुवातीला थोडेसे वाटते. परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट वाचते आणि अर्चना- मानव लिहिलेले पाहते मला मानवमध्ये सुशांतचा आवाज ऐकू येतो. कारण सुशांत कसा बोलणार हे मला माहित आहे. तो काय करणार.” याशिवाय अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतबद्दल खूप बोलत होती.
‘पवित्र रिश्ता’चे पहिले पर्व २००९ साली आला होता. या शोचे दिग्दर्शन एकता कपूरने केले होते. ‘पवित्र रिश्ता’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी या शोमध्ये छोट्या पडद्यावर बरीच चर्चा झाली होती. एवढेच नाही, तर ‘पवित्र रिश्ता’च्या शूटिंग दरम्यान हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमातही पडले. मात्र, काही काळानंतर अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांचे ब्रेकअप झाले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक
-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा