Saturday, September 19, 2026
Home बॉलीवूड कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

‘थलायवी’ या चित्रपटासाठी कंगना रणौतची सतत प्रशंसा होत आहे. विशेषत: चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि सशक्त नेत्या जयललिता यांचा बायोपिक आहे. पण, खुप कमी लोकांना माहित आहे की, जयललिता स्वतः ऐश्वर्या रायला त्यांचे पात्र साकारताना पाहायचे होते. अलिकडेच ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल ‘थलायवी’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आणि हा खुलासा देखील केला आहे.

त्या म्हणाल्या की, “मी कंगना रणौतच्या प्रतिक्रियेशी सहमत नाही. पण मी नेहमीच तिच्या अभिनय प्रतिभेला पाठिंबा देते. थलायवीमध्ये तिने मनापासून आणि जीव लावून काम केले आहे. ऐश्वर्या रायने त्यांचे पात्र साकारावे अशी जयाजींची इच्छा होती. पण मला असेही वाटते की, कंगना रणौतला पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि तिचे कौतुक केले असते. तसेच, अरविंद स्वामी पूर्णपणे एमजीआरची प्रतिरूप असल्याचे दिसते.”

यासोबतच त्यांनी असेही लिहिले आहे की, “चित्रपटात जयांचे बालपण सोडले गेले आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी तसे केले नसते, तर जयललिता यांच्या कथेवर अधिक परिणाम झाला असता, पण ही माझी मते आहेत.” चित्रपटात कंगना रणौत व्यतिरिक्त मधु, प्रकाश राज, जिशु सेन गुप्ता, भाग्यश्री यांनी मुख्य भूमिका साकारत आहेत.

समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

कंगना रणौतची अशी इच्छा होती की, ‘थलायवी’ चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रदर्शित व्हावा. ‘थलायवी’ व्यतिरिक्त, कंगना रणौतचे अनेक आंतरराज्यीय प्रोजेक्ट आहेत. कंगना सध्या ‘धाकड’ हा ऍक्शन चित्रपट करत आहे. ज्यात ती अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्तासोबत दिसणार आहे. याशिवाय ती ‘तेजस’मध्येही काम करत आहे. या चित्रपटात ती एयरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा