‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये क्रिकेट जगताचे दोन मोठे दिग्गज सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग अलीकडे आले होते. दोघांनी क्रिकेटशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या. आजकाल क्रीडा विश्वातील दोन मोठे चेहरे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि हॉकीपटू पीआर श्रीजेश यांची सर्वत्र चर्चा होत आहे. आता दोन्ही खेळाडू अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ शोमध्ये दिसणार आहेत.
हॉट सीटवर नीरज आणि श्रीजेश
होय, हे चाहत्यांसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावणारा नीरज हॉट सीटवर बसणार आहे. त्याच्यासोबत गोलरक्षक (गोलकीपर) पीआर श्रीजेश असेल. सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात अमिताभ बच्चन त्यांचे स्वागत करतात. प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपल्या देशाचे नाव ‘केबीसी १३’ च्या टप्प्यावर आणण्यासाठी टोकियो ऑलिंपिक २०२० सुवर्णपदक विजेता नीरज आणि श्रीजेश. ऑलिंपिकमधील त्यांचा संघर्ष आणि अनुभव ऐका.”
‘बिग बीं’ना नीरजने शिकवली हरियाणवी भाषा
समोर आलेल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन दोन्ही खेळाडूंना विचारतात की, “मी या पदकाला स्पर्श करू शकतो का?” त्यानंतर श्रीजेश आणि नीरज ‘बिग बीं’ना त्यांचे पदक देतात. या दरम्यान, अमिताभ बच्चन भावूक होतात आणि सेटवरील वातावरण शांत होते. नीरज अमिताभ बच्चन यांना हरियाणवी बोलायला शिकवताना दिसेल.
लोक खिल्ली उडवायचे
श्रीजेश सांगतो की, या ऑलिंपिकने त्याच्यासाठी सर्वकाही कसे बदलले आहे, तर पूर्वी त्याची लोक थट्टा करत होते. तो म्हणतो की, “आम्ही २०१२ च्या ऑलिंपिकसाठी पात्र झालो, पण एकही सामना जिंकला नाही. जेव्हा आम्ही भारतात परतलो, तेव्हा सगळे आमच्यावर हसायला लागले. आम्ही कधी कुठल्याही कार्यक्रमात गेलो, तर आम्हाला मागच्या कोपऱ्यात बसायला लावायचे. इतका अपमान करण्यात आला की, एकदा लोकांना असे वाटले की, आम्ही हॉकी का खेळत आहोत… आता वेळ आली आहे की, टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये आम्ही खेळाडूंना विचार करायला सांगितले की, आता पुढचा सामनाच नाही. जेव्हा मला पदक मिळाले, तेव्हा असे वाटले की, मी जितके अधिक ऐकले, जितका मी संघर्ष केला, मी जेवढा रडलो … हे सर्व दूर झाले.”
हा भाग कधी प्रसारित करण्यात येईल
नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश फॅन्टास्टिक फ्रायडेच्या विशेष भागाचा भाग असतील. हा भाग १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक
-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा