रॅपर कोणत्याही देशातील असो तो नेहमी आपल्या विचित्र स्टाईलमुळेच ओळखला जातो. प्रत्येक रॅपर गाण्यांसह काहीतरी हटके करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आपल्या विषयी लोकांच्या मनामद्ये एक वेगळी छाप असावी, लोकांनी आपलं नाव घेतलं की त्यांच्या डोळ्यासमोर हटके आणि वजनदार प्रतिमा उभी रहावी असे त्यांना वाटत असते. सध्या अशाच हटके लूकमुळे मॅक्सिकन रॅपर डॅन सुर चांगलाच चर्चेत आला आहे.
दुनियेतील टॉप रॅपरमधील एक डॅन सुरचा नवीन लूक खूप व्हायरल होत आहे. अनेक रॅपर वेगळ्या प्रकारचे रंग लावलेले, वेणी घातलेले, कर्व दिलेले अशी केसांची स्टाईल बनवत असतात. पण या महाशय रॅपरने, तर कमालच केली आहे. डॅन सुरने त्याच्या डोक्यामध्ये केसांऐवजी चक्क सोन्या आणि हिऱ्यांच्या साखळ्या लावल्या आहेत. तो नेहमीच असे वेगवगेळे पराक्रम करत असतो. आपल्या रॅपमुळे आपण चर्चेत नसलो तरी चालेल. पण आपल्या केसांच्या स्टाइलमुळे आपल्याला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, असं त्याला वाटतं आणि त्याच हे म्हणणं खरं देखील झालं आहे. आज प्रत्येक जण या रॅपरला त्याच्या अनोख्या केसांमुळे ओळखत आहे. त्याने या साठी मोठी शस्त्रक्रिया केली आहे. त्याचे या हटके अवतारातील फोटो तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी त्याचा हा लूक डोक्यावरच घेतला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, “मला माझ्या केसांना रंग नव्हता द्यायचा. मला काहीतरी वेगळं आणि भन्नाट करायचं होतं. यावर खूप विचार केल्यांनतर माझ्या डोक्यात ही कल्पना आली. त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी माझे आधीचे बारीक सगळे केस काढून टाकले. तसेच त्यांनी माझ्या डोक्यामध्ये काही हुक लावले. या सर्व साखळ्या त्यालाच अडकवलेल्या आहेत.”
त्याचे असे म्हणणे आहे की, त्याच्यासारखी स्टाईल आजवर कुणीच केली नाही. या दुनियेतील तो पहिलाच व्यक्ती आहे ज्याने डोक्यावर सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या साखळ्या लावल्या आहेत. परंतु हे सर्व त्याच्यासाठी काही नवीन नाही. त्याने या आधी देखील एक असाच अनोखा प्रयोग केला होता. त्याने आपल्या दातांवर सोन्याचे कवर लावले होते. त्यांना साफ करण्यासाठी त्याच्याकडे सोन्यासाचा एक ब्रश देखील होता. त्याने काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दातांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा
-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे










