Friday, March 29, 2024

‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

साऊथ आणि बॉलिवूड यांचे खूप जुने आणि जवळचे नाते आहे. अनेक साऊथ कलाकारांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा नाव कमावले, आणि बॉलिवूड कलाकारांनी साऊथमध्ये. आजच्या घडीला बॉलिवूडला प्रत्येक बाबतीत तोडीस तोड टक्कर देणारी, किंबहुना बॉलिवूडच्या दोन पावले पुढेच असणारी दाक्षिणात्य सिनेसृष्टी नेहमीच त्यांच्या भव्य चित्रपटांमुळे आणि प्रभावी कलाकारांमुळे ओळखली जाते. या साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी आधीच्या काळात बॉलिवूडमध्ये काम करत असताना त्यांच्या अभिनयाने त्यांनी सर्वांनाच वेड लावले होते. यातलेच एक मोठे आणि महत्वाचे नाव म्हणजे रम्या कृष्णन. रम्या यांची मुख्य ओळख म्हणजे ‘बाहुबली’ या सिनेमातील ‘शिवगामी’. त्यांनी साकारलेली ‘शिवगामी’ देवीची भूमिका तुफान गाजली. आज (१५ सप्टेंबर) रम्या त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

रम्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७० मध्ये चेन्नई येथे झाला. राम्या यांनी १३ व्या वर्ष तामिळ चित्रपट ‘Vellai Manasu’ यात बाल कलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या जगात पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या मोठ्या करियरमध्ये आतापर्यंत २०० पेक्षा अधिक तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम चित्रपटात काम केले आहे. राम्या यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील ५० चित्रपटांमध्ये काम केले. १९९८ मध्ये आलेल्या बडे मियाँ-छोटे मियामध्ये त्या अमिताभ बच्चनच्या अपोझिट दिसली होती. त्यावेळी त्यांच्या जोडीला लोकांना पसंती दिली होती.

या शिवाय राम्या यांनी किंग खान शाहरूख खानसोबत ‘चाहत’ या सिनेमामध्ये काम केले होते. चित्रपटातील ‘दिल की तन्हाई’ हे गाणे सुपरहिट झाले होते. बाहुबलीसारख्या चित्रपटात सिरीअस भूमिका करणाऱ्या राम्या यांचे हॉट फोटो असतील यावर विश्वास बसत नाही. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत इंटिमेट सीन्स दिले होते.

१९९३ मध्ये आलेल्या ‘परंपरा’ या सिनेमात मध्ये राम्या यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील गाणे ‘तू सावन मैं प्यार पिया’ यात रम्या यांनी विनोद खन्नासोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते. या गाण्यात राम्याने विनोद खन्नासोबत किसिंग सीनही दिला होता. १९९८ साली ‘वजूद’ सिनेमात त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतही एक बोल्ड किसिंग सीन दिला होता.

रम्या यांना ‘बाहुबली’ सिनेमाने रातोरात अमाप लोकप्रियता मिळवून दिली. एस एस राजामौली दिग्दर्शित या सिनेमात रम्या यांनी साकारलेली राजमाता शिवगामीदेवी आजही कोणी विसरू शकले नाही. कणखर, करारी, दूरदृष्टी असणारी, न्यायप्रिय आदी अनेक गन असणारी शिवगामी देवी खूपच भाव खाऊन गेली. ‘बाहुबली’ सिनेमामुळे जरी रम्याला जगभरात ओळख मिळाली. श्रीदेवी यांनी नाकारलेल्या या भूमिकेला रम्या आणि उत्तम न्याय देत ही भूमिका पडद्यावर अक्षरशः जिवंत केली. या व्यक्तिरेखेची एवढी चर्चा झाली की या ‘शिवगामी’ व्यक्तिरेखेवर ‘राइज ऑफ शिवगामी’ हे पुस्तकही लिहिण्यात आले.

अभिनेत्री राम्या यांची लोकप्रिय बाहुबली या सिनेमाच्या दोन्ही भागांनंतर अधिकच वाढली. साऊथ चित्रपटांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रम्या सर्वात आघाडीवर आहे. एका रिपोर्टनुसार, राम्या यांनी तेलुगू सिनेमा ‘सैलाजा रेड्डी अल्लुदु’मध्ये काम करण्यासाठी एका दिवसाच्या शूटींगसाठी तब्बल ६ लाख रूपये मानधन घेतल्याच्या चर्चा होत्या. या सिनेमासाठी त्यांनी २५ दिवस शूटींग केले होते त्यानुसार त्यांनी २५ दिवसांसाठी १.५० कोटी रूपये मानधन घेतले होते. रम्या यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी चार फिल्म फेअर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
श्रीदेवीमुळे चमकले रम्या कृष्णन यांचे नशीब , वयाच्या १४व्या वर्षी केलेले पदार्पण
लहान वयातच ऋषी कपूर यांच्या मुलीला आलेल्या सिनेमाच्या ऑफर, नाकारून बनली ज्वेलरी डिझायनर
ऋतिकच्या कथित गर्लफ्रेंडचा माेठा खुलासा! सांगूनच टाकलं का बदललं आडनाव

हे देखील वाचा