Wednesday, January 21, 2026
Home कॅलेंडर गायिका अमृता फडणवीसांचं नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला! पाहा कोणत्या मराठी सिनेमासाठी गायलं हे गाणं

गायिका अमृता फडणवीसांचं नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला! पाहा कोणत्या मराठी सिनेमासाठी गायलं हे गाणं

मंडळी प्रत्येक माणसामध्ये काही ना काही सुप्त कलागुण असतात. पण जगण्याच्या या रहाटगाड्यामध्ये त्या कलागुणांना वाव देण्याकरिता फारसा वेळ मिळत नाही. अशातही काहीजण आपली हौस भागवतात. सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे गेल्या पंचवार्षिकला राज्याचे मुख्यमंत्री होते. एकीकडे फडणवीस राजकारणात व्यस्त असताना त्यांच्या पत्नी अमृता मात्र विविध सिनेमांमध्ये गात होत्या. आजच्या घडीला अमृता या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये गाणी गात असतात.

अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. ७ जानेवारी रोजी ‘डाव मांडते भीती’ हे अमृता यांच्या आवाजातील गाणं झी म्युजिक कंपनीच्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित झालं. त्यांचं हे नवं गाणं अंधार या मराठी चित्रपटातील आहे. अंधार हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर कलाकृती आहे. लवकरच हा सिनेमा आपल्याला चित्रपट गृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात गुलशन देवय्या आणि सागरिका घाटगे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली. सध्या या नव्या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज येत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या व्हिडिओला देखील मिळत आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये आपल्याला चित्रपटातील काही दृश्य दिसतात तर मध्ये मध्ये आपल्याला अमृता फडणवीस यांची हे गाणं गातानाची दृश्य दिसतात. या आधी काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचं स्त्री भ्रूण हत्येवरील ‘तिला जगू द्या’ हे गाणं यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या या गाण्यावर बरीच टीका करण्यात आली होती.

याशिवाय अमृता फडणवीस या अनेक लाईव्ह कॉन्सर्टसमध्ये गात असतात. याशिवाय मुंबई पोलिसांच्या उमंग या कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी अनेकदा गाणं गायलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एका हिंदी सिनेमासाठी त्यांनी गाणं गायलं आहे. अनेक अल्बम सॉंग्ज मधूनही त्यांची कला आपल्याला पाहायला मिळाली आहे.

हे देखील वाचा