Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. शुक्रवारी (१७ सप्टेंबर) रात्री असाच काहीसा प्रकार घडला. राखीच्या नावामुळे अचानक राजकारणाच्या गल्लीबोळात खळबळ उडाली. राखीने त्यांच्यावर काहीच केले नाही. मात्र, तरीही ती राजकारणाचा भाग बनली. खरं तर, पंजाबच्या राजकारणात आयटम गर्ल राखीच्या नावाचा उल्लेख तेव्हा झाला, जेव्हा आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबी राजकारणाची राखी सावंत म्हटले. यामुळे राखी इतकी चिडली की, आप नेते राघव चड्ढा यांना एक इशारा दिला.

राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा पॅपराजींशी प्रत्येक मुद्द्यावर बोलताना दिसते. खरं तर, एक दिवस अगोदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले होते. यानंतर आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना लक्ष्य केले आणि त्यांना पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटले.

ज्याप्रकारे राखी सावंतचे नाव नेत्यांच्या पलटवारमध्ये ओढले गेले आहे. त्यामुळे राखीने आपच्या नेत्याला फटकारले. माध्यमांशी बोलताना राखी सावंत कठोर स्वरात म्हणाली की, “माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. जो कोणी मिस्टर चड्ढा असेल ना, माझे नाव जो कोणी घेईल ना, त्याचा चड्ढा काढेन. मी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मिस्टर चड्ढा तुम्ही स्वतः पाहा, तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी माझ्या नावाची गरज पडली.”

https://youtu.be/-ZHAMileZ9g

राखी सावंतने तिच्या इंस्टाग्रामवर एक ट्विटर पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश नावाच्या व्यक्तीने ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्या व्यक्तीने राघव चढ्ढा, पंजाब पोलीस, काँग्रेस, आम आदमी पार्टी, भाजप यांना टॅग केले आणि लिहिले, “तुमच्या राजकीय फायद्यासाठी कोणाची प्रतिमा खराब करू नका. कृपया आपल्या आमदाराला शिक्षण द्या. जर मी त्यांची शाळा घेतली, तर आप कुठेही दिसणार नाहीत.” राखीच्या मते, ट्वीट करणारा रितेश हा तिचा नवरा आहे.

हे ट्वीट शेअर करत राखीने कॅप्शन लिहिले की, “माझ्या पतीने राघव चड्ढाला उत्तर दिले आहे. लोक आतापर्यंत मला एकटी समजून त्रास देत होते. आज माझ्या डोळ्यात अश्रू आहेत हे सांगताना की आज माझ्याकडे ही कोणीतरी आहे. जो माझ्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी उभा आहे. धन्यवाद पती.”

राखीचे हे ट्वीट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

-निसर्गाच्या सानिध्यात योगा करताना दिसली रिया चक्रवर्ती; नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

-महेश बाबूला राग अनावर, ६ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या हृदयद्रावक अत्याचारावर केलं ‘हे’ ट्वीट

हे देखील वाचा