Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड …म्हणून ईशा देओल मुलींना ठेवते मीडियापासून दूर; पॅपराजीबद्दल बोलताना म्हणाली, ‘त्यांनी मला…’

…म्हणून ईशा देओल मुलींना ठेवते मीडियापासून दूर; पॅपराजीबद्दल बोलताना म्हणाली, ‘त्यांनी मला…’

बॉलिवूडचे कलाकार हे आपल्या अभिनयाने, अदाकारीने आणि सौंदर्याने चाहत्यांचे मनोरंजन करतात. त्यांच्या अभिनयाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. त्याचबरोबर चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घ्यायची उत्सुकता असते. फक्त कलाकारच नाही, तर कलाकारांची मुलं देखील चर्चेत असतात. त्याचबरोबर चाहत्यांना कलाकारांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.

यामध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या मुलींना पॅपराजीपासून दूर ठेवले आहे. ती अभिनेत्री म्हणजे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लाडकी लेक ईशा देओल. ईशा ही नेहमी माध्यमांपासून दूर राहते. इतकेच नव्हे, तर ती तिच्या दोन मुली राद्या आणि मिराया यांनाही मीडिया पासून दूर ठेवते. (esha deol talks about her daughter s and family)

याबद्दल माध्यमांशी बोलताना ईशा देओलने माहिती दिली. ईशा म्हणाली की, “स्टारकिड असूनही तिचे बालपण खूप साधे होते. त्यामुळे तिला तिच्या मुलींना देखील तसेच जीवन द्यायचे आहे.” माध्यमांशी बोलताना ईशाला विचारण्यात आले की, तिचे बालपण स्टारकिड असल्याने कसे होते. यावर ती म्हणाली की, “हे खरे आहे की माझे पालक सुपरस्टार आहेत. त्यांनी आम्हाला वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करण्याचे संस्कार दिले आहेत. माझे बालपण खूप सामान्य होते, ज्यासाठी मी त्यांना पूर्ण श्रेय देईन.” त्याचबरोबर ईशा पुढे म्हणाली की, तिने रिक्षा ते ट्रेन असा प्रवासही केला आहे.

यानंतर तिला पॅपराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर ती म्हणाली की, “जेव्हा आम्ही मोठे होत होतो, त्यावेळी पॅपराजी ही संस्कृतीच नव्हती. मोठ्या सुपरस्टारच्या मुली असूनही आम्हाला बाहेर पडणे सोपे होते. त्यावेळी बहुतेक लोक फक्त माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे की, ती धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. पॅपराजीबद्दल बोलायचे झाले, तर ते फक्त त्यांचं काम करत आहेत. त्यांनी नेहमीच माझ्या कुटुंबाला आणि मला खूप आदर दिला आहे. जेव्हा मी फोटोसाठी पोझ देत नाही, तेव्हा ते माझे फोटो काढत नाहीत. आमची खूप चांगली ट्यूनिंग आहे. माझ्या मुली, माझे पती, कुटुंब फक्त माझ्यासाठी आहेत आणि मला त्यांना खासगी ठेवणे आवडते. मी एक लोकप्रिय व्यक्ती आहे आणि मला माझ्या मुलांना सामान्य बालपण द्यायचे आहे.” त्यामुळे ईशा आपल्या मुलींना मीडियापासून दूर ठेवते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा