अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आपल्या कारकिर्दीमध्ये काही निवडक चित्रपटांमध्येच झळकली. पण ज्यामध्ये तिने अभिनय केला तो चित्रपट चांगलाच गाजला. तिच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे आजही अनेक चाहते आहेत. तिचे जुने चित्रपट चाहते आजही आवडीने पाहतात. चंचल स्वभावाच्या या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर खूप राज्य केले. चित्रपटांमध्ये देखील तिचा चंचल अभिनय प्रेक्षकांना खूप भावला. परंतु एकदा अभिनेत्री बॉबी देओलवर चांगलीच चिडली होती.
‘सोल्जर’ या चित्रपटावेळी प्रिती आणि बॉबी एकत्र काम करत होते. त्यावेळी बॉबी तिच्याबरोबर कशा पद्धतीने वागायचा याचा खुलासा तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता. तिने बॉबीला एका गोष्टीवरून रोखले होते. त्याच्यावर ती खूप चिडली होती. मुलाखतीमध्ये प्रितीने सांगितले की, “बॉबी नेहमी माझ्याशी मुलांसारखे वर्तन करायचा. त्याला वाटायचे मी मुलगी नाही मुलगाच आहे. तो मुलांप्रमाणेच माझ्याशी बोलायचा. सुरुवातीला मला याची खूप चीड येत होती, पण नंतर सवय झाली. बॉबी माझा खूप चांगला मित्र आहे.” (Anecdote: Preity Zinta was upset by this act of Bobby Deol, said- he never understood a girl)

बॉबीच्या ‘या’ वागण्यावर भडकली होती प्रीती
मुलाखतीमध्ये पुढे ती म्हणाली की, “बॉबी कधी कधी खूप मोठ्याने ओरडून बोलायचा. त्याची ही सवय मला अजिबात आवडत नव्हती. मला त्याचा खुप राग यायचा. त्यामुळे एक दिवस मी त्याला रोखलं आणि म्हणाले बॉबी हे काय आहे? मी खरोखरच त्याच्या या सवयीमुळे त्रस्त झाले होते.”
प्रितीला पाहून उभे राहायचे दिग्दर्शक
अभिनेत्रीने एक किस्सा सांगितला होता. यामध्ये चित्रपटांचे दिग्दर्शक तिचा खूप आदर करायचे. ती सेटवर आली की ते उठून उभे राहायचे. हा किस्सा सांगत ती म्हणाली की, “चित्रपट ‘अब्बास-मस्तान’च्या शुटिंगवेळी दिग्दर्शकांच्या अशा वागण्यावर मी एकदा त्यांना बोलले होते तुम्ही असे का करता? असे नका करू. तेव्हा ते मला म्हणाले असे कसे तुम्ही माझ्या चित्रपटाच्या अभिनेत्री आहात. तुमच्या समोर मी कसा काय बसू शकतो.”
बॉबीला म्हणाली चांगला माणूस
प्रिती पुढे बॉबीचे कौतुक करत म्हणाली की, “तो खूप चांगला व्यक्ती आहे. त्याच्या बरोबर मला कधीच असुरक्षित नाही वाटले. अनेकांनी मला बऱ्याचदा विचारले होते तुला बॉबी बरोबर असुरक्षित वाटते का? पण नाही, तो नेहमी त्याची मर्यादा ओळखून वागायचा. तसेच मी लहानपणापासून बंदूक चालवायला शिकत होते. कारण माझे वडील आर्मीत होते. बॉबीने देखील मला बंदूक चालवायला शिकवली आहे.”

अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनामध्ये मानाचे आणि प्रेमाचे स्थान मिळवले. बॉबी बरोबर ती ‘सोल्जर’सह अन्य काही चित्रपटांमध्ये झळकली. ज्यामध्ये ‘दिल्लगी’ चित्रपट देखील आहे. या दोघांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’










