भारतात कोव्हिड-१९ चा प्रवेश झाल्यापासून अनेकांना याची लागण झाली आहे. तर अनेक जण यातून बचावलेही आहेत. अनेक कलाकारांनादेखील कोव्हीडची लागण झाली होती. म्हणजे यातून खुद्द महानायक अमिताभ बच्चन देखील वाचले नाहीत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.
आताही एक प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्याने स्वतःच सोशल मीडियावर याबाबतीत माहिती दिली आहे.
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित सरीनला कोरोनाची लागण झाली आहे. अमितने सोशल मीडियावरून माहिती दिली की त्याची पत्नी आणि दोन मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यांची कोरोना टेस्ट करतानाचा व्हिडिओही त्याने शेअर केला आहे.
अमितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्याच्या कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. कोरोना चाचणीसाठी अमितच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. यावेळी, त्याच्या मुलाची चाचणी केली जात आहे ज्यामुळे तो रडतो. मुलाला रडताना पाहून कुटुंबातील बाकीचे लोक तेथे हसतात, त्यानंतर मुलगाही हसतो. पहा हा व्हिडी.
अमितने व्हिडिओसह लिहिले- ‘होय, पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाल्याने बरे वाटत नाही, परंतु आम्ही सर्व ठीक आहोत आणि बरे होण्यासाठी झगडत आहोत. माझ्या मुलांचा मला अभिमान आहे, त्यांचं हसू, रडू आम्हाला नेहमीच भावनिक करते. आपण सर्वांनी काळजी घ्या आणि काळजीपूर्वक सर्व नियमांचं पालन करा. सर्वांना खूप खूप प्रेम. ‘

अमित काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे शिफ्ट झाला होता. त्याने ‘क्यूँकी सास भी कभी बहु थी’, ‘निशा और उसके कझीन’ आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकांमध्ये काम केले आहे.










