Sunday, March 8, 2026
Home अन्य सपना चौधरीचे ‘बाबा जी’ गाणे रिलीझ; पाहायला मिळाला ‘डान्सिंग क्वीन’चा हटके अंदाज

सपना चौधरीचे ‘बाबा जी’ गाणे रिलीझ; पाहायला मिळाला ‘डान्सिंग क्वीन’चा हटके अंदाज

हरियाणातील प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीने केवळ हरियाणात नाही तर संपूर्ण देशात नावलौकिक मिळवला आहे. अतिशय मेहनतीने आणि अनेक संकटांवर मात करत हे स्थान प्राप्त केले आहे. तिचे फॅन फॉलोविंग इतका तगडा आहे की, तिचे कोणतेही गाणे प्रदर्शित झाले की, लगेच ते सुपरहिट होण्यासोबतच व्हायरल देखील होते. सपना नेहमी तिचे गाणे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अतिशय कमी कमी अंतरावर सपनाने तिचे एक एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते.

नुकतेच डान्सिंग क्वीन सपना चौधरींचे नवीन गाणे ‘बाबा जी बाबा जी’ प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात सपनाचा एका नवीनच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे गाणे शेअर करत लिहिले, “तुझ्यापासून दूर गेले तर मरून जाईल, असेच काहीसे वचनं दिले होते त्याने.” सपनाचे हे नवीन गाणे सपना चौधरी आणि विष्णु पुठी यांच्यावर चित्रित करण्यात आले असून, या गाण्याला विष्णु पुठीने त्याचा आवाज दिला आहे, तर हे गाणे जगपाल सिंह पुठीने शब्दबद्ध केले आहे. आरके क्रू ने या गाण्याला संगीत दिले असून, फरिश्ताने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे ड्रीम्स एंटरटेनमेंटने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केले आहे. काही तासांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहे.

सपनाने तिच्या करिअरची सुरुवात हरियाणवी रागिनियोने केली होती. त्यानंतर तिची गाडी हळूहळू पुढे सरकत होती. यातच तिने बिग बॉस या शोमध्ये सहभाग घेतला आणि तिला प्रचंड लाइमलाइट, प्रसिद्धी मिळाली. सपनाने ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आज. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही मात्र तिला लोकप्रियता नक्कीच मिळाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

 

हे देखील वाचा