Thursday, December 4, 2025
Home अन्य ‘इंडियन आयडल १२’मधील सायलीने कांबळेने केला तिच्या प्रेमाचा खुलासा; ‘या’ मुलाला म्हणाली, ‘मुझे तुमसे प्यार है’

‘इंडियन आयडल १२’मधील सायलीने कांबळेने केला तिच्या प्रेमाचा खुलासा; ‘या’ मुलाला म्हणाली, ‘मुझे तुमसे प्यार है’

टीव्हीवरील सुरांची मैफिल म्हणजे ‘इंडियन आयडल’ होय. या शोच्या १२ व्या पर्वामध्ये सायली कांबळेने आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. शो दरम्यान निहाल आणि तिला पाहून अनेक चाहत्यांना या दोघांमध्ये प्रेम संबंध आहेत असे वाटत होते. सेटवर तसेच बाहेर देखील दोघांना एकत्र पाहिले गेले होत. त्यामुळे सायलीच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यतील जोडीदाराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. तर आता तिच्या चाहत्यांसाठी सायलीने एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. तिने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर तिच्या बॉयफ्रेंडचे नाव घोषित केले आहे.

सायलीचे गेले अनेक दिवस निहाल बरोबर नाव जोडले जात होते. यावर तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये “असं काहीच नाही, या सर्व निव्वळ अफवा आहेत” असे सांगितले होते. आता तिने तिच्या आयुष्यातील खऱ्या राजकुमाराची माहिती सर्वांना दिली आहे. तिने धवल बरोबर एक फोटो इंस्टग्रामवर पोस्ट केला आहे. धवल तिचा बॉयफ्रेंड आहे. तिने आपल्या प्रेमाला चाहत्यांसमोर जगजाहीर करत कमेंटमध्ये लिहिले आहे की, “चलो जी आज साफ कहती हूं..इतनी सी बात है..मुझे तुमसे प्यार है” तिच्या आयुष्यातील खास आणि प्रिय व्यक्तीला पाहून तिचे चाहते खूप खुश आहेत.

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच ‘इंडियन आयडल’ १२ मधील स्पर्धक अंजली गायकवाड, मोहम्मद दानिश आणि निहाल टौरोने देखील तिच्या या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या नात्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निहालने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसत आहात” पुढे त्याने आसवांनी पाणावलेल्या डोळ्यांचे इमोजी टाकत लिहिले आहे की, “प्रेम गमावले.” त्याच्या या कमेंटवर सायलीने देखील त्याला मजेशीर रिप्लाय करत “धन्यवाद चिचू” असे लिहिले आहे. सायली निहालला प्रेमाने चिचू म्हणते. इंडियन आयडलनंतर सायलीने ‘कोल्हापूर डायरीज’ या मराठी चित्रपटासाठी एक गाणे गायले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा