Friday, March 29, 2024

जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमारला त्याच्या आताच्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. सामान्य व्यक्तीपासून मोठा स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास त्याने लोकांसमोर अनेकवेळा सांगितला आहे. त्याचा दिल्लीच्या चांदणी चौकातील रस्त्यांपासून, ते मुंबई चित्रपट उद्योगापर्यंतचा प्रवास खूप कठीण आहे. एक काळ होता, जेव्हा खान मंडळी चित्रपटसृष्टीवर राज्य करत असत. त्यावेळी कोणीही अक्षयला मोठा स्टार मानत नव्हता. ते त्याचे संघर्षाचे दिवस होता. त्याचवेळी अक्षयसोबत एक भयानक घटना घडली होती. त्याने स्वतः एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला आहे.

अशी एक वेळ आली, जेव्हा त्याला चंबलच्या डाकूंचा सामना करावा लागला. त्या दिवसांत अक्षयकडे काहीच काम नव्हते. त्यामुळे जे काम मिळेल, ते तो मन लावून करत असायचा. एक दिवस तो मुंबईहून फ्रंटियर मेलने ३-४ हजार रुपयांची खरेदी करून प्रवास करत होता. अक्षयकडे त्यावेळी खूप सामान होते. तो म्हणाला की, “त्यावेळी काहीतरी खटपट कानावर पडली आणि माझे डोळे उघडले. मी पाहिले की, दरोडेखोर ट्रेनमध्ये चढले होते. ते तिथल्या प्रत्येकाला उचलून घेत होते. मी हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर घडताना पाहत होतो.”

पुढे तो म्हणाला, “मग दरोडेखोर माझ्याकडे आले आणि सर्व वस्तू घेऊन गेले. मी झोपेचे नाटक करत राहिलो. कारण मी थोडीजरी हालचाल केली असती किंवा आवाज केला असता, तर त्यांनी मला गोळ्या घातल्या असत्या. त्यावेळी मी आतून रडत होतो पण काही करू शकत नव्हतो. त्यांनी माझी चप्पल सुद्धा सोडली नाही.

अक्षय कुमारचा जन्म १९६७ मध्ये अमृतसरच्या एका सैन्य कुटुंबात झाला. वडील हरी ओम भाटिया हे सैन्यात अधिकारी होते. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. अक्षयचे बालपण जुन्या दिल्लीतील चांदनी चौक परिसरात गेले. त्यानंतर तो मुंबईला गेला, जेथे त्याने खालसा कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केले. अक्षयने अभ्यास अर्ध्यावर सोडला आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्यासाठी बँकॉकला गेला. त्याने आपला खर्च भागवण्यासाठी बँकॉकमध्ये वेटर म्हणूनही काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळाला सोनाली पाटीलचा कोल्हापुरी रांगडा बाज; केली ‘या’ स्पर्धकांची नक्कल

-‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू

-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी

हे देखील वाचा