‘टारझन- द वंडर कार’ हा चित्रपट सर्वांना आठवतच असेल. वत्सल सेठ असे त्या चित्रपटातील अभिनेत्याचे नाव आहे. ‘टारझन- द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वत्सल सेठ लहानपणापासूनच चित्रपट आणि टीव्हीवर सक्रिय आहे. त्याने २००४ मध्ये या चित्रपटाद्वारे बॉलिवूड विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आयशा टाकिया दिसली होती. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? की, वत्सल सेठने याआधी सुपरस्टार शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
स्वतः वत्सल सेठने याबाबत नुकतीच माहिती दिली आहे. खरं तर, त्याच्या सुरुवातीच्या काळात वत्सलने शाहरुख खानसोबत एका जाहिरातीत काम केले होते. या काळात वत्सलचे वय खूप लहान होते. हा फोटो शेअर करताना वत्सल त्याने त्यावेळचा अनुभव शेअर केला आहे. वत्सलने सांगितले की, शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना तो खूप घाबरला होता, पण शाहरुख खानने त्याच्याशी बोलून त्याला कंफर्टेबल केले.
वत्सल सेठने अधिकृत इंस्टाग्राम अकाटऊंद्वारे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वत्सल सेठचे वय खूप कमी दिसते. हे जाहिरात शूट वर्ष २००० मधील आहे. ज्यामध्ये शाहरुखचे वय देखील खूप कमी दिसत आहे. हे फोटो शेअर करताना वत्सलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऑक्टोबर २००० मधील हा फोटो आहे. मी खूप घाबरलो होतो (तुम्ही ते माझ्या चेहऱ्यावर पाहू शकता) माझा विश्वास बसत नव्हता की, मी सुपरस्टार शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करत आहे.”
वत्सलने पुढे लिहिले की, “शाहरुख भाई माझ्याशी बोलले आणि शूटिंग दरम्यान मला खूप कंफर्टेबल केले. खूप नर्व्हस मुलाला मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझ्या आयुष्यातील हा एक सर्वोत्तम अनुभवांपैकी एक आहे. या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि मी त्यांना आयुष्यभर साठवून ठेवेल.”
‘टारझन’ नंतर वत्सल ‘नन्हे जैसलमेर’, ‘हीरोज’ आणि ‘हॉस्टल’सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. या चित्रपटांतील वत्सलच्या कामाचे कौतुक झाले, पण त्याला त्या प्रकारचे काम मिळू शकले नाही. २०१३ मध्ये तो पुन्हा एकदा टीव्हीकडे वळला. २०१३ मध्ये तो ‘झलक दिखला जा’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये दिसला, पण टीव्हीवर त्याचा खरा कमबॅक प्रोजेक्ट होता ‘एक हसीना थी’. एप्रिल २०१४ मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये शौर्य गोएंका नावाच्या व्यक्तिरेखेत वत्सल दिसला होता. केवळ ८ महिने चाललेला हा टीव्ही शो हिट ठरला होता. वत्सल सेठलाही याचा फायदा झाला. कारण वत्सल जे काम चित्रपटांमध्ये करू शकत नव्हता, ते त्याला टीव्हीवर करण्याची संधी मिळत होती. त्याने पुढे ‘रिश्तों का सौदागर – बाजीगर’, ‘हासिल’ आणि ‘कौन है’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना
-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ
-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा