Thursday, April 25, 2024

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीने चित्रपटसृष्टीमध्ये ड्रग्ज संदर्भात तपास तीव्र केला होता. याच क्रमाने आतापर्यंत अनेक कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पसरलेल्या ड्रग्ज ट्रॅपची चौकशी करत ऑगस्ट महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक केली होती. त्याच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. ज्यात त्याच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. यानंतर गौरवची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आता या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.

मुंबई न्यायालयाने गौरव दीक्षितला जामीन मंजूर केला आहे, पण त्यासोबत कठोर सूचनाही दिल्या आहेत. गौरवला ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन देताना न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, गौरव न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू शकत नाही. याशिवाय गौरवला प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. जोपर्यंत त्याच्यावर आरोपपत्र दाखल होत नाही. तोपर्यंत गौरवला एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल.

एप्रिल महिन्यात, एनसीबीला गौरव दीक्षितच्या लोखंडवाला घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाले होते. घरी परतत असताना गौरवच्या गर्लफ्रेंडने पोलिसांना पाहिले आणि त्यानंतर दोघेही पळून गेले. एनसीबी तेव्हापासून गौरव दीक्षितला शोधत होते. असे म्हटले जात आहे की, गौरव दीक्षित एजाज खानला ड्रग्ज पुरवायचा. एजाज आणि गौरवचा संबंध थेट शादाब बटाटाशी होता. ज्यांना एनसीबीने मार्च महिन्यात २ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली होती.

गौरव दीक्षित मूळचा भोपाळचा आहे आणि पॉवर इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी त्याने मिळवली आहे. नंतर गौरवने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अभिनेता बनला. तो चित्रपट, टीव्ही मालिका आणि जाहिरातींमध्ये अभिनयासाठी ओळखला जातो. गौरवने ‘ हॅप्पी भाग जायेगी’, ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’, ‘दहक: अ रेस्टलेस माइंड’, ‘द मॅजिक ऑफ सिनेमा’ आणि ‘गंगा के पार सैयान हमार’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच गौरव ‘सीता और गीता’ सारख्या टीव्ही शोमध्येही दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

हे देखील वाचा