मराठीमध्ये अनेक नवनवीन गाणी येत असतात. ज्यांना प्रेक्षक अगदी दिलखुलासपणे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. यावर्षी एक गाणे चांगलेच गाजले आहे. ते गाणे म्हणजे ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ होय. या गाण्याला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळाले. सोशल मीडियावर तर या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. उमेश गवळी यांनी हे गाणे गायले आहे. परंतु हे गाणे चोरीला गेल्याचा आरोप गाण्याच्या निर्मात्यांनी केला आहे. त्यांनी उमेश गवळी यांच्यावर हे गाणे चोरल्याचा आरोप केला आहे.
प्रनिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आम्ही आहोत आणि आमच्याच यूट्यूब चॅनेलवर गायक उमेश गवळी यांनी कॉपीराइटचा दावा केला आहे. यूट्यूबकडून आम्हाला स्ट्राईक आल्याने आमचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.” (O Sheth Marathi song contraversy viral on social media)
https://youtu.be/JsJfm8b4Qc0
यासगळ्या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना ज्यांनी ते गाणं गायलं त्या उमेश गवळी यांनी सांगितलं की, “या गाण्याचं कुणीही एक मालक नाही. आम्ही तिघेही मालक होतो. मी जेव्हा हे गाणं गाणार, तेव्हा त्या दोघांनी माझ्याशी संपर्क केला. वास्तविक मी आधीपासून गाणी गातो. मला या गाण्यासाठी कुठलंही मानधन मिळालं नाही. ऑडिओ त्यांच्या चॅनेलला आणि व्हिडिओ माझ्या चॅनेलला असं आमचं ठरलं होतं. आता त्यावरुन का वाद निर्माण केला जातोय. हे मला कळत नाही.” मी त्यांना गाणं पाठवल्याचे पुरावे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद पेटल्याचे दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे मूळ गाणे त्यांचे आहे आणि ते गाणे चोरून उमेश गवळी यांनी गाण्याची निर्मिती केली आहे. याआधी देखील अशी तक्रार करण्यात आली होती. परंतु या गोष्टीकडे जास्त कोणी लक्ष दिले नव्हते. खरं तर हे गाणे २७ जून, २०२१ ला ‘डीजे प्रनिकेत ऑफिशिअल’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले होते. या गाण्याची सुरुवातीला जास्त काही चर्चा नव्हती, पण एक आठवड्यानंतर या गाण्याने जवळपास सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड मोडले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण
-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना
-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ










