गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट आले आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती, परंतु पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले. रुग्णसंख्या वाढल्याने सरकारला देखील लॉकडाऊन लावावे लागले. याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला. चित्रपटसृष्टीवर देखील या परिस्थितीचा गंभीर परिणाम झाला. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून राज्यातील सगळी चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी जमाव बंदी होती. यात मनोरंजन क्षेत्राला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यातच सगळ्या प्रेक्षकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक गोड बातमी दिली आहे.
राज्यातील सगळी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. आरोग्याचे नियम पाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे खुली करण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. (From 22 October all movie and play theaters will reopen)
Theatres and auditoriums in Maharashtra will open after 22nd October 2021 while observing all COVID safety protocols. SOP is in the works and will be declared soon.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 25, 2021
शनिवारी (२५ सप्टेंबर) टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांसाठीही खास नियमावली असेल.
यात मास्क लावणं, सॅनिटायझेशनसह अनेक गोष्टींचा समावेश असेल. २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या चित्रपटगृहात किती टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येईल. हे अजून स्पष्ट केले नाही. तरीही सुरुवातीच्या दिवसांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेसह चित्रपटगृह सुरू करण्यात येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ही बातमी ऐकून प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा खूप मोठा फटका बसला आहे. यादरम्यान अनेक तरुण तसेच वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आता आख्खं जग फिरूनच घरी येणार! अजित कुमार यांनी सुरू केली जगभ्रमंती
-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान










