Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘क्यूटनेसचे दुकान’, तेजश्री प्रधानचा सुंदर आणि सोज्वळ फोटो पडला प्रेक्षकांच्या पसंतीस

मराठीमधील ‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर आणि सोज्वळ अशी अभिनेत्री आली होती. तिच्या अभिनयाची जादू एवढी आहे की, अजूनही त्या मालिकेतील तिचा अभिनय कोणताही प्रेक्षक विसरू शकला नाही. तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान होय. तेजश्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे

तेजश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. या फोटोमध्ये तिने कोणताही जास्त मेकअप केला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress tejshri pradhan share her photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “दररोज आयुष्याला आणखी सुंदर बनण्याची एक संधी द्या.” नेहमी प्रमाणेच तिच्या चाहत्यांना तिचे हे सुंदर आणि सोज्वळ रूप खूप आवडले आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “तू दिवसेंदिवस सुंदर होत आहेस,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “क्यूटनेसचे दुकान,” अशी कमेंट केली आहे.

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, पण तिची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती‌. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते.

याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता तिची कलर्स मराठीवर लवकरच नवीन मालिका येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे, पण याबाबत तिने अजूनही कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसला ‘सिद्धू’, फोटो पाहून चाहता म्हणाला, ‘मराठी शाहरुख’

-‘या’ तीन अभिनेत्रींनी केला ‘मनिके मागे हिते’ गाण्यावर जबरदस्त डान्स, शेवट पाहायला विसरू नका

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

हे देखील वाचा