‘या’ तीन अभिनेत्रींनी केला ‘मनिके मागे हिते’ गाण्यावर जबरदस्त डान्स, शेवट पाहायला विसरू नका


मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. तिचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिने तिच्या खास मैत्रीणींसोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिज्ञाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्यासोबत अभिनेत्री अनुजा साठे आणि रेशमा शिंदे दिसत आहेत. त्या तिघीही सोशल मीडियावरील श्रीलंकन ट्रेंडिंग गाणे ‘मनिके मागे हिते’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिघींनीही टॉप आणि पँट परिधान केली आहे. या व्हिडिओच्या शेवटी रेशमा आणि अभिज्ञा अनुजाला सोडून बाजूला जातात. त्यांच्या या व्हिडिओचा शेवट अगदी मजेशीर आहे. (Abhidnya bhave, reshma shinde and Anuja sathe dance on manike mage hithe song)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले की, “शेवट पाहा, ‘मनिके मागे हिते’ करता करता काय झाले हिथे.” तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे, तर अनेकजण त्यांच्या ‘लगोरी’ या मालिकेची आठवण काढत आहेत.

अभिज्ञा, अनुजा आणि रेशमा यांनी स्टार प्रवाहवरील ‘लगोरी’ या मालिकेत एकत्र काम केले होते. मालिकेत पाच मैत्रिणींची कहाणी दाखवली होती. त्यांची ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांची खूप चांगली मैत्री आहे. अनेक ठिकाणी त्या एकत्र स्पॉट होतात. नुकतेच अभिज्ञा भावेची लग्नानंतर पहिली मंगळगौर झाली, तेव्हा रेशमा आणि अनुजा या दोघीही या कार्यक्रमात सामील झाल्या होत्या. तिघीही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात सध्या खूप व्यस्त आहेत. रेशमा सध्या स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काम करत आहे. अभिज्ञा हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे, तर अनुजाच्या ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जय अन् मीरामध्ये चांगलीच जुंपली; ‘अशा’प्रकारे रंगला ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरामध्ये कॅप्टन पदाचा डाव

-‘भूमिकेसाठी आपण जे करतो तेच भूमिका आपल्यासाठी करते’, म्हणणाऱ्या मोहित रैनाने सिनेमासाठी शिकली परदेशी भाषा

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान


Leave A Reply

Your email address will not be published.