Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यात मेकअप, ड्रेस, अभिनय, कॅमेरा या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या असतात. मात्र, यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोशूट. कलाकार नेहमीच आपले वेगवेगळे फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रुती मराठे हिचा समावेश होतो. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

श्रुतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा एक डॅशिंग लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच वेगळी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस टी-शर्ट तसेच पांढरे डॉट असलेली काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. तिने केवळ हातात एक ब्रेसलेट घातले आहे. तसेच तिने कर्ली हेअर करून तिच्या केसांना एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. (Marathi actress Shruti Marathe share her dashing look photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आपले आयुष्य हा एक समुद्र किनारा आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक लाटेचा आनंद घ्या.” तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. काहींना तिचा हा ड्रेस आवडला आहे, तर काहींना तिचा लूक आवडला आहे. काही चाहते तिने दिलेल्या कॅप्शनचे कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोवर ३५ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. तसेच हा फोटो मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.

श्रती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

-‘माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी…’, म्हणत भरत जाधवने दिल्या महेश कोठारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

-मित्राकडून उसने पैसे घेऊन केला पहिला सिनेमा, आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक, आहेत महेश कोठारे

हे देखील वाचा