Sunday, December 3, 2023

मित्राकडून उसने पैसे घेऊन केला पहिला सिनेमा, आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक, आहेत महेश कोठारे

भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठी व्यक्तीनेच रोवली. फाळके यांनी एक अवघड आणि अशक्य वाटणारे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांच्यामुळेच आपल्याला ‘चित्रपट’ मिळाले. फाळके या मराठी माणसानेच सिनेमे सुरू केले असले, तरी मराठी चित्रपटाच्या बाबतीत 80,90 चा काळ अजिबात चांगला नव्हता. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत हिंदी चित्रपटांना प्राधान्य देत होते. अशा काळात काही मोजक्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मराठी चित्रपटांना पुन्हा पूर्वीची झालेली मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे महेश कोठारे.

‘डॅमिट’ हे नाव ऐकले की, डोळ्यासमोर एकच चार येतो आणि तो म्हणजे महेश कोठारे. एक उत्तम अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक असलेले महेश यांनी नेहमीच मराठी मनोरंजनविश्वात वेगेवेगळे प्रयोग करून ही सिनेसृष्टी पुढे आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. हिंदीच्या तोडीसतोड सिनेमे त्यांनी मराठीत केले. एक प्रयोगशील दिग्दर्शक असणाऱ्या महेश कोठारेंचा आज 28 सप्टेंबरला 70वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृतीतून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

महेश कोठारे यांचा जन्म 28 सप्टेंबर 1957 रोजी जन्मलेले महेश कोठारे यांना घरातून अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत. त्यांचे वडील अंबर कोठारे हे प्रसिद्ध अभिनेते तर आईसुद्धा अभिनेत्री. साहजिकच त्यांना या क्षेत्राचा ओढा होता. त्यांनी ‘छोटा जवान’, ‘राजा और रंक’ मधून बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाला सुरूवात केली. ‘राजा और रंक’ चित्रपटातील ‘तू कितनी अच्छी है’ हे गाणे तुफान गाजले, आजही हे गाणे अतिशय उत्साहाने ऐकले जाते. महेश कोठारे यांनी मराठी, हिंदी अनेक चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले.

‘छोटा जवान’ या सिनेमात भूमिका कशी मिळाली याबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “माझे वडिल अंबर कोठारे यांनी ‘जेथे जाऊ तिथे’ या नाटकाची निर्मिती करत होते. त्या नाटकासंदर्भात बोलण्यासाठी ते गजानन जहागिरदार यांना भेटायला गेले होते. त्यावेळी मी देखील त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट केला. ते मला घेऊन गेले मला पाहून गजानन जहागिरदार म्हणाले ‘मला माझा छोटा जवान’ सापडला.”

त्यांचा अभिनय प्रवास ते मोठे झाल्यानंतर देखील त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. मात्र त्यांचे अर्वच सिनेमे जोरदार आपटले. वकिलीचे शिक्षण झाले असल्याने त्यांनी काही काळ वकिलीही केली. पण त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाही. अभिनेता म्हणून यश येत नसल्याने त्यांनी सिनेमांची निर्मिती करण्याचे ठरवले.

मात्र चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसल्याने त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून 20 हजार रुपये उसने घेऊन ‘प्यार किये जा’ या हिंदी सिनेमाचे हक्क त्यांनी निर्मात्याकडून विकत घेतले आणि त्याचा मराठीत ‘धूमधडाका’ नावाने रिमेक बनवला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मराठी सिनेसृष्टीत धूमधडाका उडाला आणि महेश कोठारे दिग्दर्शक म्हणून नावारुपास आले.

महेश कोठारे यांनी हिंदीत ‘मासूम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर पुढे त्यांनी हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘लो मैं आ गया’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. पण दुर्दैवाने हा चित्रपट आपटला. या चित्रपटाच्या अपयशाने ते आर्थिकदृष्ट्या 20 वर्षे मागे गेले. त्यांना मोठे नुकसान झाले.

पुढे त्यांनी मराठी इंडस्ट्रीकडेच पूर्ण लक्ष दिले आणि एकापेक्षा एक सरस सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी ‘धडाकेबाज’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पाहिल्याचं सिनेमास्कोप आणला. अनेक विनोदी चित्रपटांची निर्मिती करून लोकांना हसवत हसवत रडवणाऱ्या करणाऱ्या महेश कोठारेंनी ‘चिमणी पाखरं’ हा सिनेमा बनवून प्रेक्षकांना खरोखरच रडवले. या सिनेमात त्यांनी डॉल्बी डिजिटल साउंड वापरला होता.

महेश यांनी 2004 साली पछाडलेला सिनेमा बनवला ज्यात त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदाच कॉम्पुटरद्वारे देण्यात येणाऱ्या इफेक्ट्सचा वापर केला होता. 1993 साली त्यांनी ‘झपाटलेला’ सिनेमा बनवला होता. जो तुफान गाजला. याच सिनेमाचा पुढचा भाग 2013 साली त्यांनी तयार केला ‘झपाटलेला 2’. हा मराठीमधील पहिला 3D सिनेमा होता.

याशिवाय त्यांनी ‘दे दाणादाण’, धांगड धिंगा’, ‘खबरदार’, ‘थरथराट’, ‘माझा छकुला’, ‘शुभमंगल सावधान’ आदी अनेक सुपरहिट सिनेमे तयार केले. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मिळणारे महत्व लक्षात घेऊन त्यांचा मोर्चा मराठी मालिकांकडे वळवला. त्यांनी ‘जय मल्हार’, ‘पाहिले न मी तुला’, ‘विठू माउली’, ‘जयोस्तुते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ आदी अनेक सुपरहिट मालिकांची निर्मिती केली.

मराठीमध्ये महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन या चार मित्रांनी मिळवून अनेक सुपरहिट सिनेमे दिले. या लोकनी मराठी सिनेमासृष्टीचा चेहरा मोहरच बदलून टाकला. आजही महेश मनोरंजनविश्वात सक्रिय आहे.


महत्त्वाच्या बातम्या-
रसिका सुनीलनं केलं बोल्ड फोटोशूट, हॉट लुकवर चाहते फिदा
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात

हे देखील वाचा