Tuesday, October 14, 2025
Home कॅलेंडर Sholay: जेव्हा रागाच्या भरात धरमजींनी झाडली होती खरी गोळी, थोडक्यात वाचले होते बिग बी

Sholay: जेव्हा रागाच्या भरात धरमजींनी झाडली होती खरी गोळी, थोडक्यात वाचले होते बिग बी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ज्यांना आपण ‘बिग बी’ असेही म्हणतो. ते दरवेळेस ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये छोटे-मोठे मजेदार किस्से सांगताना दिसतात. अलीकडेच त्यांनी ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा असाच एक धक्कादायक किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.

या दिवसांमध्ये अमिताभ बच्चन सोनी टीव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करताना दिसत आहेत. या शोमध्ये हॉट सीटवर बसलेल्या व्यक्तीने प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यावर त्यांना बक्षीस म्हणून ठराविक रक्कम मिळते. शिवाय हीच अशी संधी असते, जेव्हा चाहत्यांना अमिताभ यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी ऐकायला मिळतात. अशाच एका एपिसोडमध्ये त्यांनी ‘शोले’ या चित्रपटा दरम्यानचा धक्कादायक प्रसंग सांगितला. जो ऐकुन सर्वचजण चकित झाले होते. यावेळी बिग बींनी सांगितले की, शूटिंग दरम्यान धर्मेंद्र यांनी नकली नाही, तर खरी बंदूक चालवली होती. ज्याची गोळी त्यांच्या कानाजवळून गेली होती.

यावेळी अमिताभ म्हणाले की, “जेव्हा आम्ही ‘शोले’ची शूटिंग करत होतो. त्यावेळी एक सीन होता, त्यामध्ये मी डोंगराच्या वरच्या टोकला उभा होतो आणि धर्मेंद्र हे डोंगराच्या पायथ्याला थांबले होते. धर्मेंद्र यांनी पेटी उघडली आणि दारुगोळा उचलला. पण तरीही गोळ्या काय उचलल्या गेल्या नाहीत. म्हणून त्यांनी परत एकदा प्रयत्न केला. तरीही गोळ्या उचलल्या गेल्या नाही. त्यामुळे धर्मेंद्र खूप चिडले होते. मग मला नाही समजलं की, ते काय करत आहेत. त्यानी बंदूकमध्ये काडतुस टाकली. त्या गोळ्या खऱ्या होत्या. एकही शॉट नीट येत नसल्यामुळे ते चिडलेले होते. त्यांननी रागात गोळी चालवली आणि मला एक ‘हुस्स’ असा आवाज आला. मी डोंगरावर उभा होतो आणि गोळी माझ्या कानाजवळून गेली होती. मी वाचलो. शोले फिल्मच्या वेळेस अशा अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे शोले वास्तवमध्ये विशेष चित्रपट होता.”

रमेश सीप्पी यांच्या चित्रपटाला ४६ वर्ष पूर्ण झाली आहेत. हा क्लासिक चित्रपट १५ऑगस्ट १९७५ ला सिनेमागृहात आला होता. यानंतर शोलेचा व्हिडिओ आणि सीडी बाजारात आल्या. आता इंटरनेटवर सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेल्या चित्रपटांत या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा