Tuesday, October 14, 2025
Home मराठी ‘मार ही डालोगी क्या?’, अमृता खानविलकरच्या बोल्ड अदांवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

‘मार ही डालोगी क्या?’, अमृता खानविलकरच्या बोल्ड अदांवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नावाचा समावेश असतोच. अमृता ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत.

अमृताने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अमृताने काळ्या रंगाचा एक ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिने स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच नाकात नोझपिन घातली आहे आणि हलकासा मेकअप केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. (Marathi actress Amrita Khanvilkar share her bold photos on social media)

तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या या फोटोवर अदा खान, ऋतुजा बागवे आणि प्रसाद ओक यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा घायाळ करणारा अंदाज खूप आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “अमृता तू आधीच खूप सुंदर आहेस त्यात असा लूक म्हणजे काळजाचा ठोका वाढवत आहे.” तर आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, “काय बोलू शब्द नाहीत आता.” तर दुसरा म्हणतोय, “मार डालोगी क्या?” अशा प्रकारे या फोटोवर कमेंटस आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

तसेच तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा