Monday, June 17, 2024

Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

टीव्हीमधील सगळ्यात मोठा रियॅलिटी शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बिग बॉस’चे १५ वे पर्व कालपासून सुरू झाले आहे. ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील आवडता शो आहे. सुरू होण्यापूर्वीच या शोची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी होत असतात. नुकतेच ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वाच्या आलिशान घराचे फोटो समोर आले आहेत, जे प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट निर्माते ओमंग कुमार यांनी या घराची रचना साकारली आहे.

बिग बॉस च्या घराद्दल बोलताना ओमंग कुमार अस सांगतात की, बिग बॉस च्या घराची रचना करणे दरवर्षीच मोठे आव्हान असते. नेहमीपेक्षा वेगळी आणि आकर्षक निर्मिती करण्याकडे आमचा भर असतो, असे ते म्हणतात. त्यांच्या या कामात त्यांची पत्नी सुधा त्यांना मदत करते.

15 व्या पर्वाच्या घराबद्दल सांगताना ते म्हणतात की, “आम्हाला सुरुवातीलाच यावेळी जंगलासारखी घराची रचना असावी, असे चॅनलकडून सांगण्यात आल होत. त्या प्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने डिझाईन केली आहे. घरात असलेल्या बागेत अनेक झाडे, झुडपे गवत आहे. मोठमोठे झोपाळे या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच बागेतून कलाकारांना प्रवेश करण्यासाठी एक गुप्त दरवाजा ठेवला आहे.”

किचन आणि बेडरूम मध्येही आपल्याला जंगलाचा भास होईल अशी रचना केली आहे, असे ते म्हणतात. इथे सहभागी होणारे कलाकार महिना महिना इथ राहत असल्याने त्यांना आवडेल अशा आणि आरामदायी घराची निर्मिती करणे, आमचे मूळ उद्दिष्ट असते, असेही ते सांगतात. बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून ओमंग कपुर हे या घराची रचना करत आहेत.

दरम्यान या शोचे होस्टिंग यावर्षीही अभिनेता सलमान खान करणार आहे. बिग बॉसच्या यशात सलमान खान हा महत्त्वाचा चेहरा आहे, असे मानल जात. त्यामुळे सलमान खानचे मानधनही खुप अधिक असते. यावेळी सलमान खान या कार्यक्रमासाठी तब्बल २५ करोड इतकी मोठी रक्कम घेणार असल्याचे समोर आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’च्या मंचावर रणवीर सिंगला पाहून सलमान खान चकित; म्हणाला, ‘कलर्सची तर…’

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

हे देखील वाचा