Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा ‘पती- पत्नीमध्ये जे काही होते ते…’, म्हणत नागा अन् समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांची मोठी प्रतिक्रिया

‘पती- पत्नीमध्ये जे काही होते ते…’, म्हणत नागा अन् समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांची मोठी प्रतिक्रिया

मागच्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे. अभिनेत्री समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक अधिकृत निवेदन जारी करत ते घटस्फोट घेणार असल्याची माहिती दिली आहे. लग्नाच्या चार वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे दोघांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता नागार्जुन यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नागार्जुन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी जड अंतःकरणाने ही पोस्ट लिहीत आहे, सॅम आणि चय यांच्यामध्ये जे झाले ते खूपच वाईट आहे. पती पत्नीमध्ये जे होते ते खूपच वैयक्तिक असते. सॅम आणि चय माझ्यासाठी खूपच जवळचे आहे. माझे कुटुंब नेहमीच सामंथासोबत घालवलेल्या सर्वच क्षण खूप एन्जॉय करतील. सामंथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल. दोघांनाही देव शांती देवो आणि कणखर करो.”

समंथाने एक स्टेटमेंट जारी करत त्यात लिहिले की, “आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, चय आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूपच भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा अधिकआहे जी, आमच्या नात्याचा आधार होती. हीच मैत्री आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि यातून बाहेर पाडण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.”

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा