मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नावाचा समावेश असतोच. अमृता ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत.
अमृताच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही बोल्ड फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातावर एक टॅटू दिसत आहे. (Marathi actress amruta Khanvilkar share her bold photos on social media)
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर श्रेया बुगडे, स्वप्नील जोशी, नंदिता पाटकर यांनी कमेंट केल्या आहेत, तर हा फोटो पाहून तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मनमा इमोशन जागे.” तसेच इतर अनेक चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.
तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड
-‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज
-तुटलेलं नातं पुन्हा जुळणार? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारने मारली स्नेहाला मिठी