Wednesday, April 15, 2026
Home हॉलीवूड चाहत्यांसाठी चित्रपटांची मेजवानी! डिझनी इंडियाने केली आगामी चित्रपटांची रिलीझ डेट जाहीर; ‘अवतार २’चाही समावेश

चाहत्यांसाठी चित्रपटांची मेजवानी! डिझनी इंडियाने केली आगामी चित्रपटांची रिलीझ डेट जाहीर; ‘अवतार २’चाही समावेश

हॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी (०५ ऑक्टोबर) डिझनी इंडियाने आपल्या आगामी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मार्व्हल मूव्हीज आणि जेम्स कॅमरून यांचा बहुप्रतिक्षित चित्रपटाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या यादीवरून समजते की, ‘ब्लेड’ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. असे असले, तरीही निर्मात्यांकडून अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. डिझनी इंडियाच्या यादीत ‘ब्लेड’ चित्रपट पुढील वर्षी ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ऑस्कर विजेत्या महरशला अली अभिनित ‘ब्लेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन बासम तारिक यांनी केले आहे. या चित्रपटात मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये नवीन पात्र सादर केले जाईल. पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच यामध्येही कॅमिओ पाहायला मिळेल. एमसीयूपूर्वी ही भूमिका मागील तिन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता वेस्ले स्निप्स यांनी साकारली होती. (Before The Official Announcement Marvel India Reveals Blade Release Date)

मार्व्हल चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे बासम तारिक सहावे व्यक्ती आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त रायन कूगलर, क्लो झाओ, डेस्टिन क्रेटन, तायका वेट्टी आणि निया डकोस्टाही कॅमेऱ्यापुढे आणि मागे यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. चला तर पाहूया डिझनी इंडियाने जाहीर केलेली संपूर्ण यादी.

यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी
द लास्ट ड्युएल- २२ ऑक्टोबर
रॉन गॉन राँग- २९ ऑक्टोबर
इटर्नल- ५ नोव्हेंबर
एनकँटो- २६ नोव्हेंबर
वेस्ट साईड स्टोरी- १० डिसेंबर
द किंग्स मॅन- २४ डिसेंबर

सन २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी
डेथ ऑन द नाईल- ११ फेब्रुवारी
टर्निंग रेड- ११ मार्च
डॉक्टर स्ट्रेंज- मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस- २५ मार्च
थॉर: लव्ह एँड थंडर- ६ मे
लाईट इअर- १७ जून
ब्लॅक पँथर- वकांडा फॉरएव्हर- ८ जुलै
ब्लेड- ७ ऑक्टोबर
द मार्व्हल्स- ११ नोव्हेंबर
अवतार २- १६ डिसेंबर

या यादीत ‘ब्लेड’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ७ ऑक्टोबर आहे. म्हणजेच मनोरंजनाच्या बाबतीत डिझनी नेहमीच पुढे राहिले आहे. येणार्या काळातही नेहमीच या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक नवीन प्रोजेक्ट पाहायला मिळतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर

-अंमली पदार्थ प्रकरणी अडकलेल्या आर्यन खानला गुरुवारी मिळणार जामीन? जाणून घ्या काय सांगतात प्रसिद्ध वकील

-पतौडी पॅलेसमधून होणाऱ्या कमाईबाबत सैफचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझी आईच घेते सर्व, मी फक्त नावापुरता…’

हे देखील वाचा