बॉलिवूड हे गेल्या काही वर्षांपासून कपूरमय झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिनेते अनिल कपूर आणि संजय कपूर यांनी बॉलिवूडचा रुपेरी पडदा नेहमीच गाजवला आहे. बोनी कपूर यांनी नेहमीच चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या पत्नी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या तर बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार होत्या. या मागच्यापिढीनंतर कुटुंबातील नवी पिढीदेखील चित्रपटांमध्ये सक्रिय होऊ लागली. अर्जुन कपूर, सोनम कपूर, जान्हवी कपूर यांना आपण विविध चित्रपटांमधून पाहिलंच आहे. पण जरा थांबा या कुटुंबातून आणखीन एक नाव बॉलिवूड मध्ये येण्याची चिन्ह दिसत आहेत. अशीच एक कपूर सध्या सोशल मीडियामध्ये ट्रेंड होतेय. तिचे अनेक फोटोज व्हायरल होत आहेत. नुकताच तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. नेमकी ही व्हायरल कपूर आहे तरी कोण? चला तर मग आज पाहुयात.
अभिनेते संजय कपूर यांची लेक शनाया कपूर हिचे फोटोज आणि व्हिडिओज हे गेल्या काही काळापासून सतत व्हायरल होत असतात. गंमतीचा भाग म्हणजे शनायाचं स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट आहे परंतु ते तिने प्रायव्हेट करून ठेवलं आहे. गंमतीचा भाग म्हणजे तरीदेखील तिचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या तिचा असाच एक डांस व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये शनाया एका इंग्रजी गाण्यावर कमालीच्या सुरेख शैलीत डांस करतेय. ती तीच्या कोरियोग्राफरसह या गाण्यावर ताल धरताना दिसतेय. तिच्या या व्हिडिओला पाहून सगळेच चाहते इंप्रेस झाले आहेत. जान्हवी कपूरपासून ते बॉलिवूडचे इतर सेलेब्स शनायाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. तिचं नृत्यकौशल्य पाहता सगळेच ती बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी एकदम तयार असल्याचं सांगत आहेत.
शनायाचा हा व्हिडिओ तिच्या आईनेच म्हणजे महीप कपूर यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या सोबतच शनाया हे सर्व कलागुण तिच्या आईकडूनच शिकली असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. चाहत्यांनीही मग प्रेमाने महीप यांना डांस करून दाखवण्याची मागणी केली आहे. आता महीप कपूर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.