आपल्याकडे, आपल्या कामावर दृढ निष्ठा असेल तर जग सुद्धा जिंकता येतं असं म्हटलं जातं. टीव्हीची ‘नागीन’ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री नियाने हे खरं करून दाखवलं आहे. अलीकडेच एक आलिशान घर विकत घेतल्यानंतर, तिने आता एक लक्झरी कारदेखील खरेदी केली आहे, जिचे फोटो आणि व्हिडिओ स्वतः नियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नियाने व्होल्वो एक्ससी ९० डी ५ इन्स्क्रिप्शन कार खरेदी केली आहे, जिची किंमत आपण जाणून घ्यायला तर दंग व्हाल.
निया शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर नवीन कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, या नव्या कारची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये इतकी आहे. चमकदार ब्लॅक व्हॉल्वो एक्ससी ९० डी ५ इन्स्क्रिप्शन वरील आवरण काढतानाचा व्हिडिओ नियाने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना निया शर्माने लिहिलंय की, ‘आपण आनंद खरेदी करू शकत नाही, परंतु आपण एखादी कार खरेदी करू शकता आणि जवळजवळ या दोन्ही गोष्टी समानच आहेत.’
टीव्ही कलाकारांबरोबरच चाहतेही नियाच्या या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत, तसेच तिचं जोरदार अभिनंदन देखील करत आहेत. रवी दुबे, आमिर अली, अर्जुन बिजलानी, गीता फोगाट, आशा नेगी, शांतनु माहेश्वरी अशा अनेक कलाकारांनी निया शर्माच्या या व्हिडिओवर नवी कार घेतल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.त्याचबरोबर सोशल मीडिया युझर आणि तिचे चाहतेही तिचं अभिनंदन करत आहेत. एका वापरकर्त्याचे अभिनंदन करताना लिहिलंय की आता ‘नागिन’ कारमध्ये प्रवास करणार आहे.
कार घेतल्यानंतर ती तिचा मित्र रवी दुबे, अर्जुन बिजलानी यांच्यासह नव्या कारचा आनंद साजरा करण्यासाठी लॉंग ड्राइव्हवर सुद्धा गेली होती.
नवीन वर्षाच्या सुरूवातीला घराचे फोटो शेअर करताना नियाने कॅप्शनमध्ये लिहिले होते की ‘अखेर माझं स्वप्नवत घर मिळालं! राहायला एक नवं घर सापडलं. हॅप्पी २०२१!
https://www.instagram.com/p/CJfidkHFiJX/?igshid=2x7cvwdhxic6
‘काली’ या मालिकेद्वारे नियाने टीव्ही जगात पाऊल ठेवलं. यानंतर निया शर्मा ‘एक हजारो में मेरी बहना है’ या मालिकेत दिसली. ज्यामध्ये तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. यासह ती ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावा’ मध्ये दिसली होती.
टीव्ही शो ‘नागीन’ मध्ये तीने इच्छाधारी नागिनची भूमिका साकारली होती. सन २०२० मध्ये तिने ‘खतरों के खिलाडी’ या शोची ट्रॉफी जिंकली आणि आजकाल ती पुन्हा जमाई राजा मालिकेच्या सीझन २ ची तयारी करतेय.