आई-वडिलांना सर्वात प्रिय आणि जवळची असतात ती म्हणजे, त्यांची मुलं. लग्नानंतर मुल होणं आवश्यक असतं, कारण ते म्हातारपणात तुमची काठी बनतात. जवळजवळ सर्वचजण पालक बनणे पसंत करतात. मात्र काहीजण असेही असतात, जे एखाद्या कारणात्सव पालक बनू इच्छित नाहीत. सर्व सामान्यांप्रमाणेच यात काही कलाकारांचाही समावेश आहे. असे काही दिग्गज कलाकारांचे जोडपे आहेत, ज्यांनी लग्नानंतर पालक न बनणंच योग्य समजलं आणि मूल जन्माला घातलं नाही.
अनुपम खेर- किरण खेर
अनुपम खेर आणि किरण खेर ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधील खूप मोठी नावे आहेत आणि आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघे पहिल्यांदा चंदीगडमध्ये भेटले होते. दोघांची मैत्री झाली. मग दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले. आपापल्या लग्नात अपयशी ठरल्यानंतर दोघे १९८५ मध्ये पुन्हा भेटले. किरणला त्यांच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा सिकंदर होता, ज्याला अनुपमने त्यांचे नाव दिले. मात्र त्यांनी त्यांची मुले जन्माला घातली नाही. (from shabana azmi javed akhtar to anupam kher kirron kher these 8 bollywood couples never had kids of their own after marriage)
आशा भोसले- आर डी बर्मन
बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड आणि पौराणिक जोडप्यांपैकीच एक आशा आणि बर्मन यांनी १९८० मध्ये लग्न केले. याआधी आशा भोसले यांचा विवाह गणपतराव भोसले यांच्याशी झाला होता. दोघांना तीन मुले होती. मात्र, लग्नाच्या ११ वर्षानंतर आशा आणि गणपत वेगळे झाले. त्यानंतर आशा ताई आरडी बर्मनच्या प्रेमात पडल्या. दोघांनी लग्न केले पण त्यांना मूल नव्हते. त्यांचे मूल त्यांचे संगीत आहे, असे ते मानतात.
दिलीप कुमार- सायरा बानू
दिलीप आणि सायरा यांची जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. दिलीप साहेब आता या जगात नसले, तरी ते त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत. दिलीप आणि सायरा यांचे लग्न १९६६ मध्ये झाले होते. दोघे ५ दशकांहून अधिक काळ एकत्र होते. जरी दोघांना मुले नव्हती, दोघांचे प्रेम एकमेकांसाठीच पुरेसे होते. दिलीप साहेबांनी शाहरुख खानला आपला मुलगा मानले. त्याचवेळी सायरा म्हणाल्या की, दिलीप कुमारची काळजी घेणे म्हणजे १० मुलांची काळजी घेण्यासारखे आहे.
डॉली अहलुवालिया – कमल तिवारी
बेल बॉटम चित्रपटात अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री डॉली अहलुवालिया यांनी कमल तिवारीसोबत लग्न केले. कमल यांनी ओमकारा चित्रपटात करीना कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. दोघांनी प्रेमविवाह केले होता. पण तरीही त्यांनी स्वतःची मुले या जगात न आणण्याचा निर्णय घेतला.
कमल अमरोही- मीना कुमारी
बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन असलेल्या मीना कुमारी यांनी दिग्दर्शक कमल अमरोही यांच्याशी लग्न केले होते. कमल आणि मीराच्या वयात १५ वर्षांचा फरक होता. असे मानले जाते की, कमल यांना त्यांच्या पहिल्या लग्नापासून एक मूल होते आणि त्यांना मीना यांच्याकडून मूल नको होते. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात त्यांचे विचार वेगळे झाल्याने दोघांचा घटस्फोट झाला.
शबाना आझमी- जावेद अख्तर
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी १९८४ मध्ये लग्न केले. दोघांनीही मूल न घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या लग्नापासून जावेद यांना फरहान आणि झोया ही दोन मुले अख्तर आहेत. जावेद यांचे पहिले लग्न हनी इराणीसोबत झाले.
विद्या बालन- सिद्धार्थ रॉय कपूर
विद्या आणि सिद्धार्थचे लग्न २०१२ मध्ये झाले. दोघेही सुरुवातीपासूनच त्यांच्या नात्यात आनंदी आहेत आणि एकमेकांना आधार देत आहेत. विद्याच्या गर्भधारणेबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. तिने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, मूल न होणे ही तिच्या आणि तिच्या पतीमधील बाब आहे. ती मुलं जन्माला घालण्याची मशीन नाही. त्याचवेळी, ती असेही म्हटली की, त्यांना मुले नाहीत तर ही काही वाईट गोष्ट नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा
-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे