Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड भर कार्यक्रमात ‘हे’ कलाकार डबल मिनिंग जोक मारत वातावरण करतात ‘नॉटी’

भर कार्यक्रमात ‘हे’ कलाकार डबल मिनिंग जोक मारत वातावरण करतात ‘नॉटी’

सिनेसृष्टीमध्ये सर्वच कलाकार हे त्यांच्या हटके अभिनयाने आणि दमदार संवादांमुळे ओळखले जातात. हे संवाद देखील अनेकदा सिनेचाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. अशात कलाकार अभिनय तर चांगला करतातच पण सार्वजनिक ठिकाणी बोलायला घाबरतात. मात्र काही कलाकार असेही आहेत जे कोणतीही भीती अथवा मर्यादा न बाळगता त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी देखील डबल मिनिंगचे जोक मारताना दिसतात आणि चाहत्यांच्या आठवणीत राहतात. सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी अशा डबल मिनिंग जोकमुळे चाहत्यांना पोट दुखेपर्यंत हसवले देखील आणि अषाचार्याचा मोठा धक्का देखील दिला. त्यातीलच काही कलाकार आणि त्यांचे खळखळवून हसवणारे विनोद जाणून घेऊ.

आलिया भट्ट

आलियाने तिच्या अभिनयाने आजवर प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहे. विविध कलांमध्ये निपुण असणाऱ्या आलियाची ही बाजू तेव्हा समोर आली जेव्हा ती एका सिनेमाचे प्रमोशन करत होती. आलिया ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमाला आली असताना एका पत्रकाराकडे वेगळ्याच पद्धतीने माईक मागितला. तिची माईक मागण्याची पद्धत खूपच विचित्र होती. तिचा हा डबल मिनिंग जोक तेव्हा सर्वांच्या लक्षात आला आणि तिथे एकच हशा पिकला.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला तुम्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळे विनोद करताना पाहिलेच असेल. ‘हेराफेरी’ चित्रपटामधून त्याने अनेकांना खळखळून हसवले आहे. अशात ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याने एक डबल मिनिंग जोक केला होता. माणसाच्या शरीरातील हाडे मोजण्यावरून त्याने हा डबल मिनिंग जोक मारला होता.

रितेश देशमुख

या यादीमध्ये रितेश देशमुख देखील शामिल आहे. एका पत्रकार परिषदेत रितेश आणि जिनिलिया पोहचेल होते. त्यावेळी या दोघांमध्ये भरपूर मजा मस्ती सुरू होती. तेव्हा अचानक रितेशने असा काही विनोद केला त्यावर सर्व जण त्याच्याकडे एकटक पाहतच राहिले. तेव्हा त्याने त्याच्या डबल मिनिंग जोकला सावरण्याचाही प्रयत्न देखील केला होता.

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान चित्रपटांमध्ये कधी साधे किस सीन देखील देत नाही. पण डबल मिनिंग जोक मारण्यात तो देखील पटाईत आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक वेळा तो असे जोक करताना दिसला आहे.

वरुण धवन

वरुण धवन कायमच त्याच्या क्यूटनेसमुळे आणि दमदार बॉडीमुळे ओळखला जातो. तो एक उत्तम अभिनेत्यासह एक उत्तम डान्सर देखील आहे. वरुण देखील अनेकदा सार्वजनिक ठिकणी असे डबल मिनिंग जोक करुन सर्वांना हसवले आहे.

करण जोहर

करण जोहर त्याच्या चॅट शोमध्ये अनेक वेळा डबल मिनिंग जोक करताना दिसला आहे. या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकारावर तो असे विनोद करत असतो. या शोमधील त्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपिका पदुकोण

दीपिकाच्या अभिनयाची तर बातच और आहे. काही वर्षांपूर्वी तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. यामध्ये तिने केलेला डबल मिनिंग जोक ऐकून तुम्ही देखील चकित झाला असाल. त्यावेळी दीपिका तिच्या आधीचा बॉयफ्रेंड असणाऱ्या रणबीर कपूर बरोबर एका चित्रपटाचे प्रमोशन करत होती. त्यावेळी ती रणवीर आणि रणबीर दोघांनाही “पलंगतोड” म्हणाली होती.

रणबीर कपूर

‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणबीरने करण जोहरवर एक विनोद केला होता. त्यावेळी त्याने करणला उद्देशून डबल मिनिंग जोक केला होता.

शाहरुख खान

या यादीमध्ये शाहरुखचे नाव पाहून तुम्हीही चकित झाला असला. पण शाहरुख खान देखील डबल मिनिंग जोक करण्यात माहीर आहे. दीपिका बरोबर एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्याने असा काही घाणेरडा विनोद केला होता की, त्यामुळे दीपिका मान खाली करुन खूप हसू लागली होती.

याशिवाय अनेक कलाकार बऱ्याचदा लोकांसमोर विविध सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान डबलमिनींग जोक करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

हे देखील वाचा