बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये यावर्षी अनेक वेगवेगळे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. या पर्वात कलाकारांसोबत इतर अनेक सामान्य माणसांची देखील एन्ट्री झाली आहे. कलाकारांसोबत सामान्य नागरिकांचा या शोमध्ये असणारा सहभाग हा या शोचा मुळात पायंडा आहे. शोमध्ये या वर्षी महिला कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे या पर्वात घरात काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील अशी सर्वांना आशा होती.
या शोमध्ये आल्यावर सांप्रदायिक क्षेत्रातील अनेकजण शिवलीला यांच्यावर नाराज झाले होते. त्यांनी या शोमध्ये सहभाग घ्यायला नको होता असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार टीका चालू होत्या. तसेच त्यांनी या क्षेत्रात पुन्हा येऊ नये असे अनेकजण म्हणत होते. अशातच दुसऱ्या आठवड्यात त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना बिग बॉसच्या देखरेखी खाली ठेवण्यात आहे. परंतु काही दिवसातच त्यांनी स्वतःहून या शोमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जाण्याने घरातील सगळ्याच सदस्यांना खूप दुःख झाले. (shivleela patil apologized to people who was upset on her bigg boss marathi entry)
घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत जे तिच्यावर नाराज झाले आहेत. त्यांची जाहीर माफी मागितली. दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “मी बिग बॉसमध्ये गेल्याने वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याने मी डोकं टेकवून त्यांची माफी मागते. या शोच्या माध्यमातून माझे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस होता.”
पुढे त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याविषयी प्रेक्षकांचे प्रबोधन करावे याच हेतूने मी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेले होते. मी एका गाण्यावर नाचले म्हणून माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली. पण त्यातील एक गाणे विठुरायाच्या वारीचे होते तर दुसरे गाणे देवी तुळजा भवानीचे होते. इतर कोणत्याही हिंदी गाण्यावर मी नृत्य केलं नाही.”
शिवलीला बिग बॉसच्या घरात आल्यामुळे तिला आता कीर्तन क्षेत्रात पुन्हा येण्याचा अधिकार नाही असे सगळ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे तिला खूप जास्त ट्रोल केले जात होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…
–बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास