Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

तेजश्री प्रधान करणार ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, लवकरच होणार सिनेमा प्रदर्शित

 

मराठीमधील ‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर आणि सोज्वळ अशी अभिनेत्री आली होती. तिच्या अभिनयाची जादू एवढी आहे की, अजूनही त्या मालिकेतील तिचा अभिनय कोणताही प्रेक्षक विसरू शकला नाही. तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान. तेजश्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. लवकरच तेजश्री एका बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे.

तेजश्रीने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी हिंदी चित्रपटातील काही फोटो शेअर करून ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिने आगामी चित्रपटाचे नाव ‘बबलू बॅचलर’ असे आहे. या चित्रपटातील फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून, तिने चित्रपटाची टीम आणि काही कलाकारांसोबत हे फोटो शेअर केले आहेत. (Tejashri pradhan is entering in bollywood from Bablu bachelor film)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “फायनली बबलू बॅचलर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १० दिवस राहिले आहे.” तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन तिचे अभिनंदन करत आहेत. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देत आहेत.

या चित्रपटात तेजश्रीसोबत शरमन जोशी आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अग्निदेव चटर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातून तेजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिचा करिअरला कलाटणी देण्यास लाभदायक ठरणार आहे. ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

हे देखील वाचा