Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्याला ओळखू शकले होते श्रीराम नेने, माधुरी दीक्षितने केला खुलासा

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्याला ओळखू शकले होते श्रीराम नेने, माधुरी दीक्षितने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये धमाल करत आहे. तिने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. तिच्या लूक आणि निरागसतेने आजही चाहते वेडे होतात. परंतु तिने डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून प्रत्येकाचे हृदय तोडले होते. लग्नानंतर माधुरीने आपल्या चित्रपट कारकिर्दीला अलविदा करून अमेरिकेत स्थलांतर केले होते. ती आणि तिचे पती श्रीराम नेने रविवारी (१७ ऑक्टोबर) आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.  आज, आपण तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लग्नाच्या रिसेप्शनशी संबंधित एक किस्सा जाणून घेऊया.

श्रीराम नेने यांना सुरुवातीला माधुरी दीक्षितच्या स्टारडमबद्दल कल्पना नव्हती. ते पहिल्यांदा माधुरीला तिच्या भावाच्या घरी भेटले. लग्न करण्यापूर्वी दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते.

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कोणालाही ओळखू शकले नाही
माधुरीने सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, श्रीराम यांनी तिचा कोणताच बॉलिवूड चित्रपट पाहिला नाही. ती म्हणाली, “मी आणि त्यांच्या आईने त्यांना माझा चित्रपट दाखवण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांना म्हणालो की हे गाणे पाहा. यावर श्रीराम म्हणाले होते की, आपण दुसरे काही करू शकत नाही का? चला बाहेर जाऊ आणि काहीतरी करू.”

यावेळी माधुरीने सांगितले की, श्रीराम तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये इंडस्ट्रीतील कोणत्याही स्टारला ओळखू शकले नाहीत. त्यांनी फक्त एका व्यक्तीला ओळखले होते, ते अमिताभ बच्चन होते. माधुरी म्हणाली की, “मला वाटते की, श्रीराम फक्त अमिताभ बच्चन यांना रिसेप्शनमध्ये ओळखू शकले होते. शालेय काळात त्यांनी त्यांचा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट पाहिला होता. ते म्हणाले होते की, मला वाटते मला हा चेहरा माहित आहे. मी त्यांना सांगितले होते की, तुम्ही त्यांना ओळखता, कारण तुम्ही त्यांचा चित्रपट पाहिला आहे.” डॉ.नेने यांनी अमिताभ बच्चन यांना तरी किमान ओळखले होते. इतर कोणत्याही स्टारला न ओळखण्यामागचे कारण म्हणजे त्यांनी कधीही कोणताही हिंदी चित्रपट पाहिला नव्हता.

काही दिवस डेट केल्यानंतर त्यांनी १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लग्न केले. आज त्यांना दोन मुले अरिन आणि रायन आहेत. अरिनने यावर्षीच अमेरिकेत आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले आहे. त्याचवेळी, रायन १६ वर्षांचा झाला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर माधुरी दीक्षित अलीकडेच डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’ मध्ये परीक्षक म्हणून दिसली होती. आता ती लवकरच डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. तिच्या या सीरिजचे नाव ‘फाइनडिंग अनामिका’ आहे. ही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माधुरीच नाही, तर ‘या’ अभिनेत्रीसोबतही इंटिमेट सीन करताना हरपले होते विनोद खन्नांचे भान; पुढे…

-माधुरी दीक्षितच्या ‘अनामिका’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सिनेमाच्या निमित्ताने धक धक गर्लचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा