Thursday, March 30, 2023

माधुरीच नाही, तर ‘या’ अभिनेत्रीसोबतही इंटिमेट सीन करताना हरपले होते विनोद खन्नांचे भान

बॉलिवूडमध्ये बोल्ड चित्रपट किंवा सीन्स अगदी साधारण गोष्ट झाली आहे. या चित्रपटांचे प्रमाण आज जरी जास्त दिसत असले, तरीही जुन्या काळापासून हे चित्रपट तयार होत आहेत. चित्रपटात दाखवले जाणारे हे इंटिमेट सीन्स प्रेक्षकांना देखील खूप आवडतात. परंतु पडद्यावर अत्यंत रोमँटिक सीन्स चित्रित करताना ते खूप भयावह होतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना असे सीन करताना किंवा किस करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. या अभिनेत्रींनी या गोष्टीवर त्यांचा अनुभवही शेअर केला आहे.

तसेच बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते देखील आहेत, जे किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन्स देण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. याच यादीत दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचे नाव देखील सामील आहे. अनेकवेळा असे इंटिमेट सीन्स देताना त्यांना भान राहत नसायचे. माधुरी दीक्षितसोबतच्या त्यांच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा चालू होती. आणखी एक अशी अभिनेत्री होती, जिच्यासोबत असे इंटिमेट सीन्स करण्यासाठी ते उतावीळ झाले होते. (vinod khanna and dimple kapadia kissing story when actor lost control during intimate scene)

महेश भट्ट यांच्या ‘मार्ग’ या चित्रपटात विनोद खन्ना डिंपल कपाडियासोबत काम करत होते. या चित्रपटात त्या दोघांचा एक रोमँटिक सीन देखील होता. यात त्यांचा एक किसिंग सीन होता. हा सीन शूट करताना विनोद खन्ना यांचे भान हरपले होते आणि दिग्दर्शकांनी कट बोलल्यानंतरही ते डिंपल कपाडियाला किस करत राहिले.

हा सीन रात्री शूट केला होता. ज्यामध्ये सेटवरील सगळी लाईट डिम केली होती. जेव्हा महेश भट्ट ऍक्शन असे बोलले, तेव्हा विनोद आणि डिंपलमध्ये किसिंग सीन सुरू झाला. मात्र, कट बोलल्यावर देखील विनोद खन्ना थांबले नाही. यानंतर डिंपल खूप घाबरल्या होत्या. तेथून त्या थेट मेकअप रूममध्ये पळून गेल्या होत्या.

अशीच घटना माधुरी दीक्षितसोबत देखील झाली होती. ‘दयावान’ चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या कलाकारासोबत इंटिमेट सीन देत होती. त्यावेळी देखील किसिंग सीनच्या वेळी विनोद खन्ना यांचे भान हरपले आणि ते खूप वेळ माधुरीला किस करत राहिले. त्यावेळी ती खूप नाराज झाली होती.

याबाबत बोलताना माधुरीने सांगितले होते की, जेव्हा ती हा सीन शूट करत होती, तेव्हा ती खूप नर्व्हस होती. तसेच विनोद खन्ना देखील नर्व्हस होते. परंतु नंतर त्यांनी माधुरीची माफी मागितली होती, परंतु तिने एकदा सांगितले होते की, त्या गोष्टीचा तिला पश्चाताप होत आहे. तसेच जेव्हा केव्हा तिला या गोष्टीची आठवण येते, तेव्हा तिला खूप वाईट वाटते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरर! ‘बिग बॉस १५’ मधील ‘या’ स्पर्धकांना चाहत्यांकडून ‘बोरिंग कंटेस्टेंट्स’चा टॅग; पाहा यादी

-दुर्दैवच म्हणायचं अन् काय! आर्यन प्रकरणावर शाहरुखच्या ‘या’ १० मित्रांनी पाळले मौन; केले नाही एकही ट्वीट

-‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

हे देखील वाचा