Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुष्मिता सेनला गिफ्टमध्ये कोणीच देऊ शकत नाही ‘डायमंड’, बॉयफ्रेंडही नाही; जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या नवनवीन स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सतत चर्चेत असते. तसेच ती अनेकदा आपल्या कामाने आणि विचारांनी चाहत्यांना इंप्रेस करत असते. काही वर्षांपूर्वी सुष्मिता सेन म्हटली होती की, महिलांनी स्वतःसाठी हिरे खरेदी करावे. आता तिने एका नवीन मुलाखतीत खुलासा केला आहे की, ती तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलला स्वतःसाठी हिरे खरेदी करण्याची परवानगी देत ​​नाही.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने स्पष्टपणे सांगितले की, “मी माझ्या कोणत्याही मित्राला मला हिरा गिफ्ट करून देत नाही. मला ते स्वतः विकत घ्यायला आवडतात. मला त्यांना भेटवस्तू देणे आवडते.” ती असेही म्हणते की, जेव्हा तिने पहिल्यांदा हिरा स्वतःसाठी विकत घेतला, तेव्हा तो 10 सेंटचा होता, ज्यात शुद्ध सोन्याचा बँड होता. त्याची साइज ॲडजस्ट केली जाऊ शकत होती. नंतर हळूहळू तिने 22 कॅरेट देखील घेतला.

तिच्या जुन्या विधानावर चर्चा करताना ती म्हणाली की, “हिऱ्याचा आकार महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की, माणूस हिऱ्याच्या आकाराशी जुळत आहे की हृदयाशी. हे हृदयासाठी अवघड आहे, म्हणून तुमच्या हिऱ्याच्या आकारावर काम करा आणि ते मोठे करत रहा.” ती म्हणाली की स्वतःसाठी बँचमार्क सेट करणे महत्वाचे आहे.

लक्षणीय म्हणजे 2016 मध्ये सुष्मिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “हिरा माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो.” त्या पोस्टमध्ये तिने “मी स्वतःला काही काळापूर्वी भेट दिली होती” असे म्हटले होते. यासह हे देखील लिहिले होते की, “एकतर माझ्या स्टोनच्या साइज लहान दाखवा किंवा माझ्या हृदयाच्या साइजशी मॅच करा.”

जेव्हा सुष्मिता त्या अंगठीसह दिसली तेव्हा तिच्या साखरपुड्याबद्दल अफवा उडू लागल्या होत्या. नंतर तिने या अफवांना संपवत सांगितले की, “ही अंगठी मला आणि तुम्हा सर्वांना आठवण करून देणारी आहे की, मला माझ्या आयुष्यात हिरे गिफ्ट करण्यासाठी माणसाची गरज नाही. मी ते स्वतः घेऊ शकते.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सुष्मिताने ‘आर्य’ वेबसिरीजद्वारे डिजिटल पदार्पण केले आहे. चाहत्यांसह कलाकारांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तिने दुसऱ्या सीझनचे शूटिंगही पूर्ण केले आहे आणि लवकरच त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. तिने ‘बीवी नंबर वन’, ‘मैं हूं ना’, ‘मैने प्यार क्यों किया’, ‘तुमको ना भूल पायेंगे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (actress sushmita sen says she does not allow anyone to gift diamonds not even rohman shawl)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
रोहमन शॉलपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन होती ‘या’ व्यक्तींच्या प्रेमात

इतक्या वर्षांनी सुष्मिता सेनने सांगितले लग्न न करण्यामागील मोठे कारण, वाचा सविस्तर

हे देखील वाचा