रोहमन शॉलपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन होती ‘या’ व्यक्तींच्या प्रेमात


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने अलिकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आणि रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली. रोहमन आणि सुष्मिता बराच काळ एकत्र होते पण हे नाते फार काळ टिकले नाही. काही काळ एकत्र राहिल्यानंतर आता दोघेही वेगवेगळ्या वाटेवर गेले आहेत. रोहमनसोबत विभक्त झाल्यानंतर सुष्मिताचे ब्रेकअप झाल्याची पुष्टी झाली आहे. चला तर मग सुष्मिताच्या सर्व बॉयफ्रेंड्सबद्दल जाणून घेऊया…

रोहमन शॉल

सुष्मिता पहिल्यांदा रोहमन शॉलला एका फॅशन शोमध्ये भेटली होती. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडली आणि डेट करायला सुरुवात केली. या दोघांच्या नात्याची इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती, मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

ऋतिक भसीन

सुष्मिताने ऋतिक भसीनला जवळपास ४ वर्षे डेट केले होते. दोघेही लग्न करणार असून, मुंबईत घर शोधत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

बंटी सचदेवा

सुष्मिताने बंटी सचदेवालाही डेट केले होते. असे म्हटले जाते की, बंटीने सुष्मिताची फसवणूक केली होती, त्यानंतर अभिनेत्रीने त्याला सोडले.

साबीर भाटिया

सुष्मिता हॉटमेलचे संस्थापक साबीर भाटियासोबतही रिलेशनशिपमध्ये होती, असे म्हटले जाते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

संजय नारंग

अभिनेत्री सुष्मिताने सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संजय नारंगलाही डेट केले होते. असे म्हटले जाते की, दोघांचीही एंगेजमेंट झाली होती. पण त्यावेळी सुष्मिता लग्नासाठी तयार नव्हती आणि दोघे वेगळे झाले.

विक्रम भट्ट

सुष्मिताने सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनाही काही काळ डेट केले होते. दस्तक चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

वसीम अक्रम

सुष्मिताचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबतही जोडले गेले होते. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडत नसल्याने काही महिन्यांतच त्यांच्यात अंतर निर्माण झाले.

इम्तियाज खत्री

सुष्मितानेही काही काळ इम्तियाज खत्रीला डेट केले होते. या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा झाली पण लवकरच ते वेगळे झाले.

मुदस्सर अजीज

सुष्मिताच्या आयुष्यात दिग्दर्शक मुदस्सर अजीजही आला होता. पण फार काळ टिकला नाही. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनीही आपले मार्ग बदलले.

रणदीप हुडा

‘कर्मा’ चित्रपटाच्या सेटवर रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. काही काळ एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!