नुकताच बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा अंगावर शहारा आणणारा ‘सरदार उधम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. थोर क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्या आयुष्यावर बनलेल्या या चित्रपटात विकीच्या अभिनयासोबतच त्याच्या लूकचीही प्रशंसा केली जात आहे. त्याने उधम सिंग यांचे हुबेहूब पात्र साकारण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. त्यामुळेच तो हे पात्र पडद्यावर जिवंत करू शकला. अशातच त्याने सोशल मीडियावर या चित्रपटातील आपल्या पात्राचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या पाठीवर जखमांचे निशाण दिसत आहेत, जे खूपच चित्तथरारक आहेत. हे पाहून चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.
विकीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याच्या उघड्या पाठीवर धारधार शस्त्रांनी केलेल्या घावाचे अनेक निशाण दिसत आहेत. यातील काही निशाण हे जुने आणि काही नवे दिसत आहेत. खरं तर, या घावांचे निशाण हे खरे नसून चित्रपटासाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र, तरीही हे पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या या फोटोवर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Actor Vicky Kaushal Show Prosthetic Scars On Back Fan Jokes Viral)
एका चाहत्याने लिहिले की, “हे घाव पाहिल्यानंतर कॅटरिनाला दु:ख होईल.” आणखी एका चाहत्याने लिहिले की, “उफ्फ! कसं काय लागलं हे?” दुसरीकडे काही चाहते विकीला विचारत आहेत की, “सर, हे तुम्ही कसे केले?” एका चाहत्याने त्याच्या या लूकला ‘गदर’ म्हटले. विकीच्या अनेक चाहत्यांना विश्वास बसत नाहीये की, हे निशाण खरे आहेत की खोटे. एका युजरने विचारले की, “हे निशाण खरे दिसत आहेत सर. खरंच असं आहे का?”
विकीने आपल्या कॅप्शनमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, हे निशाण असे आहेत, ज्यासाठी कोणतेही निशाण नाही लागले.
विकीच्या या फोटोला आतापर्यंत ६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हजारो युजर्सनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे