‘दादा, तू माझे जग आहे’, म्हणत बॉबी देओलने बहिणींसोबतचा फोटो पोस्ट करत सनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सनी देओल हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आणि आक्षण हिरो म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या दमदार ऍक्शनच्या जोरावर स्वतःचे वेगळे आणि पक्के स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. आज १९ ऑक्टोबरला सनी देओल आपला ६५वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने सनीला इंडस्ट्रीमधील मोठमोठ्या कलाकारांनी आणि सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व शुभेच्छा संदेशांमध्ये सनीचा छोटा भाऊ असणाऱ्या बॉबी देओलने मोठ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सुंदर संदेशसुद्धा लिहिला आहे. बॉबीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सनी देओल आणि बॉबी देओलसोबत त्यांच्या दोघी बहिणी सुद्धा दिसत आहे. बॉबीच्या या सुंदर शुभेच्छांमुळे सनीचा वाढदिवस आणखीनच खास झाला आहे.

सनी देओलचा भाऊ असणाऱ्या बॉबी देओलने भावाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी देओल, बॉबी देओल सोबत त्यांच्या बहिणी अजिता आणि विजेता सुद्धा दिसून येत आहेत. या फोटोसोबत बॉबी देओलने एक संदेश सुद्धा लिहिला आहे. ज्यामध्ये हार्ट ईमोजी सोबत ‘हॅप्पी बर्थडे दादा, तुम्ही माझे जग आहेत.’ असे लिहीत या सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत. एकमेकांना मिठी मारत असतानाचा हा फोटो खूपच खास आणि कॅन्डीड आहे. या चारही भावंडांचा हा फोटो त्यांच्यामधील असलेल्या प्रेमळ नात्याची साक्ष देत आहे. बॉबी देओलच्या या फोटोवर चंकी पांडे, दर्शन कुमार, अली हाकिमसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत सनी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

दरम्यान १९ ऑक्टोंबर १९५६ रोजी जन्मलेल्या सनी देओलचे मूळ नाव अजय सिंग देओल आहे. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता म्हणून सनी देओलची चित्रपट क्षेत्रात ओळख आहे. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ चित्रपटातून सनीने चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले होते. चित्रपट क्षेत्रासह सनी देओल राजकारणात सुद्धा तितकाच सक्रिय झाला असून, तो सध्या भाजपाचा खासदार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खुश खबर! नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समंथाने दिली आनंदाची बातमी

-आर्यन खानने जेलमध्ये एनसीबी संचालक समीर वानखेडेंना दिले ‘हे’ वचन; ऐकून शाहरुखलाही वाटेल अभिमान

-नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

Latest Post