बॉलिवूडमध्ये अनेक महागडे कलाकार आहेत. त्यामध्ये सुपरस्टार सलमान खानच्या नावाचा आवर्जुन समावेश केला पाहिजे. तो यशस्वी चित्रपटांसोबतच सर्वाधिक मानधण घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान चित्रपटाव्यतिरिक्त वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती आणि इतर प्रोजेक्टमधूनही चांगली कमाई करतो. मुंबईत त्याची मोठी संपत्ती आहे. मात्र, असे असूनही तो आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील प्रसिद्ध गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणे पसंत करतो.
आता अभिनेत्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. त्याने नुकतेच आपल्या वांद्रे येथील घराजवळ एक डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेता दर महिन्याला या अपार्टमेंटसाठी ८.२५ लाख रुपये भाडे देणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे अपार्टमेंट वांद्रे येथील मकबा हाईट्सच्या १७ व्या आणि १८ व्या मजल्यावर आहे. या संपत्तीचे मालक बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी आहेत. (New House Actor Salman Khan Rents A Duplex In Bandra Will Pay A Rent of RS 8.25 Lakh Every Month)
या २,२६५ चौरस फूटाचे अपार्टमेंट सलमानने ११ महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे डुप्लेक्स कथितरीत्या सलमानच्या फर्मसाठी काम करणाऱ्या लेखकासाठी पॅड म्हणून वापरला जाईल.
सलमान खानच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर सलमानने नुकतीच आपल्या आगामी ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर असून हा चित्रपट येत्या २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माही दिसणार आहे. चित्रपटात सलमान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. दुसरीकडे आयुष एका गँगस्टरची भूमिका साकारेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाला टक्कर देईल.
‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान ‘टायगर ३’ चित्रपटात कॅटरिना कैफसोबत दिसेल. मनीष शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये प्रदर्शित होईल. याव्यतिरिक्त सलमान खानकडे ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘किक २’ यांसारखेही अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे