काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. कदाचित त्या गाण्याचे बोल कुणाला समजले नसतील, परंतु ते गाणे सर्वांना खूप आवडले होते. गाण्यासोबतच त्या गाण्याची गायिकाही भलतीच प्रसिद्धीच्या झोतात आली. त्या गाण्याचे नाव ‘मनिके मागे हिते’ होय. तसेच या गाण्याची गायिका इतर कोणी नाही, तर योहानी ही आहे. आता योहानीबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी श्रीलंकन गायिका योहानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने सामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांची मने जिंकली आहेत. अशातच योहानी आपल्या या ब्लॉकबस्टर गाण्याचे हिंदी व्हर्जन सुपरस्टार अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात गाणार आहे.
इंद्र कुमार दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी योहानीला या मूळ गाण्याच्या हिंदी व्हर्जनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे गाणे योहानी आपल्या सुरेल आवाजात गाणार आहे.
असे म्हटले जात आहे की, हे गाणे तनिष्क बागची कंपोज करतील आणि रश्मी विराग हे गाणे लिहितील. या चित्रपटात अजय तिसऱ्यांदा रकुलसोबत काम करणार आहे.
योहानीबाबत बोलायचं झालं, तर ती नुकतीच ‘बिग बॉस १५’च्या सेटवर सलमान खानसोबत स्टेज शेअर करताना दिसली होती. या खास क्षणी सलमाननेही तिचे हे गाणे गाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शब्द न समजल्याने त्याने ते बदलले होते.
योहानीने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती हिंदी गाणे गाताना दिसत आहे. तिच्या या गाण्यावर चाहते अक्षरश: फिदा झाले आहेत. अशामध्ये आता योहानीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे