बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक असणारी अनुष्का शर्मा सध्या अभिनयापासून दूर राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अनुष्का सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचे, पती विराट कोहली आणि मुलगी वामिका यांचे बरेच फोटो पोस्ट करताना दिसते. नुकताच विराट आणि वामिकाचा खुप सुंदर फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझे पूर्ण ह्रदय एकाच फ्रेममध्ये’. सोशल मीडियावर अनुष्काने जो फोटो शेअर केला आहे त्याला फॅन्स भरभरून प्रतिसाद देत आहेत. या फोटोमध्ये वामिका तिच्या पाळण्यामध्ये बसलेली दिसत आहे, आणि विराट तिला बघत तिला खेळवत आहे.
विराट आणि अनुष्काचे फॅन्स या फोटोवर हार्ट वाली इमोजी बनवून ते या फोटोबद्दल असणारे प्रेम व्यक्त करत आहे. विराट आणि वामिका यांच्या फोटोवर फॅन्सच नाहीतर बॉलीवूडचे कलाकार देखील कंमेट करत आहे. यातच अभिनेता रणवीर सिंगने ह्या फोटोवर दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वत्र गाजताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CVKserNswrb/?utm_source=ig_web_copy_link
रणवीर सिंगने कंमेंटमध्ये हार्टवाली इमोजी पोस्ट करत ‘हाय’ लिहिले आहे. रणवीरच्या या कंमेंटमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, वडील विराट आणि मुलगी वामिका यांच्या या कॅनडिड फोटोला पाहून रणवीर खूपच खुश झाला आहे. त्याचा आनंद त्याच्या या कंमेंटमधून व्यक्त झाला असून. त्याच्या या कमेंटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत त्याला देखील वेगवेगळे प्रश्न विचारत आहे.
रणवीर सध्या टीव्ही शो ‘द बिग पिक्चर’ मध्ये दिसत असून, या शोमध्ये तो म्हणाला होता की त्याला दीपिकासारखी गोंडस आणि सुंदर मुलगी हवी आहे. रणवीरच्या या कंमेंटनंतर चाहते आता अंदाज लावत आहेत की, हे जोडपे आई-वडील होण्यास तयार आहे. एका चाहत्याने कंमेंट केली की, ‘आता तुमचाच नंबर आहे छोटा रणवीर द्या किंवा दीपिका येऊ द्या.’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘तुम्ही कधी गुड न्युज देणार आहे.’
रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला जवळ जवळ ३ वर्षे झाले आहेत. रणवीर आणि दीपिका बॉलीवूडच्या सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. ६ वर्ष एक- दुसऱ्याला डेट केल्यानंतर दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले होते. रणवीरसोबतच दिया मिर्जा, सुनील शेट्टी, रकुल प्रीत सिंह, नीति मोहन, सानिया मिर्जा आदी अनेक सेलिब्रिटींनी अनुष्काच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे