Saturday, March 15, 2025
Home मराठी ‘कधीही गृहीत धरू नका’, म्हणत रेश्मा शिंदेने शेअर केला ग्लॅमरस फोटो

‘कधीही गृहीत धरू नका’, म्हणत रेश्मा शिंदेने शेअर केला ग्लॅमरस फोटो

आजच्या एकविसाव्या शतकात देखील आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वर्णभेद केला जातो. अनेकवेळा अनेक ठिकाणी गोऱ्या रंगाच्या माणसांना आणि सावळ्या रंगाच्या माणसांना वेगळी वागणूक दिली जाते. या एका आगळ्या-वेगळ्या विषयावर भाष्य करणारी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ नावाची मालिका आहे. मागच्या वर्षी या मालिकेला सुरुवात झाली. एक वेगळी कहाणी घेऊन आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला. या मालिकेत रेश्मा शिंदे ही मुख्य भूमिकेत काम करत आहे. अभिनयासोबत ती सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या ग्लॅमरस लूकचे दर्शन ती नेहमीच तिच्या चाहत्यांना देत असते. अशातच तिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

रेश्माने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. यासोबत तिने कानात काळ्या रंगाचे इअरिंग आणि बोटात काळ्या रंगाची अंगठी घातली आहे. तसेच केसांचा बन घालून मेकअप केलेला दिसत आहे. या लूकमध्ये एकंदरीतच ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. (rang majha vegla fame reshma shinde’s glamrous look viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “असे कधीही गृहीत धरू नका की, मोठ्या आवाजात बोलणे हे शक्तिशाली आहे तर हळू आवाजात बोलणे हे कमकुवत आहे.” तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. दररोज दीपाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रेश्मापेक्षा ही ग्लॅमरस रेश्मा सगळ्यांना खूप आवडली आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

तिची ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेत सावळा रंग असल्याने एका मुलीला समाजातून अनेक गोष्टींसाठी नकार येतात. सगळे ज्ञान असून देखील केवळ रंग सावळा असल्याने तिला अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. लग्न झाल्यानंतर सासूला तर सावळ्या रंगाचा स्पर्श देखील झालेला चालत नाही. तरी देखील त्या घरात राहून ती सगळ्यांचे मन जिंकून घेते. अशाप्रकारे या मालिकेची कहाणी दाखवली आहे. या मालिकेत अनेक वळणं पाहायला मिळाली आहे.

मालिकेत आता ६ वर्षांचा लिप दाखवला आहे. त्यामुळे मालिकेची कहाणी एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत रेश्मा शिंदेसोबत आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत. याआधी देखील तिने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने ‘लगोरी’, ‘रंग हे प्रेमाचे’, ‘नांदा सौख्यभरे’, या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा 

-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात

हे देखील वाचा