‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. घरात सोनाली आणि विशाल यांची मैत्री चांगलीच गाजली आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अनेकजण त्यांच्या मैत्रीचे कौतुक करतात. तसेच त्यांच्यामध्ये प्रेमाचे रंग खुलू लागलेत, असे अनेकांचे म्हणणे आहे. सोनाली आणि विशाल एकाच टीममध्ये असल्याने दिवसभरातील बराच वेळ ते एकत्र असतात, त्यामुळे त्यांच्यातील रुसवे, फुगवे, भांडण आणि प्रेम सगळ्यांनीच पाहिले आहेत. मात्र, नुकतेच या दोघांमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले आहे.
बिग बॉसच्या घरातील या लोकप्रिय जोडप्यामध्ये चांगलेच खटके उडाले आहेत. यावेळी विशाल बेडवर बसलेला असतो. यावेळी सोनाली तिथे येते आणि म्हणते की, “मी तुझ्यात टाईम इन्वेस्ट करते मग मला पण तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत ना.” यावर विशाल म्हणतो की, “मी नाही का माझा टाईम इन्वेस्ट करत.” यावर ती म्हणते की, “तू माझं नाव का घेतलं तिथे विकास सांगत होता ना.” मग विशाल म्हणतो की, “तू त्याचं आणि माझं मत एक नको करूस.” यानंतर ती रडायला लागते आणि म्हणते की, “तुला माणसांची किंमत नाहीये.” (Bigg boss marathi 3 : quarrel between sonali patil and Vishal nikam)
यानंतर सोनाली किचनमध्ये जाते आणि विकास आणि आदिशला रडक्या आवाजात म्हणते की, “त्याला आपल्या माणसांचं चुकीचं दिसतं. तो आपल्या माणसांना डोक्यावर घेऊ शकतो आणि पायाखाली देखील तुडवू शकतो.” नंतर ती विकासला म्हणते की, “एकतर त्याला ग्रूपमध्ये घे नाहीतर हाकलून टाक ग्रूपमधून.”
खरंतर सोनाली आणि विशाल हे प्रेक्षकांचे आवडते स्पर्धक आहेत. त्यामुळे सगळे त्यांना असं करू नका, असे सांगत आहेत. तसेच त्या दोघांना एकत्र या शोमध्ये बघायचे आहे.
त्यामुळे आता पुढे त्यांच्यामध्ये काय होणार आहे, हे बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंद गगनात माझा मावेना! ‘या’ कारणामुळं भलतीच खुश झालीय सई ताम्हणकर
-Video: जेव्हा ट्रेंडिंग गाण्यावर स्वीटूने मारले ठुमके, बघतच राहिले नेटकरी!
-सायली संजीवच्या मेहेंदीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी म्हटले, ”लागा लग्नाच्या तयारीला मिसेस गायकवाड’