Friday, March 29, 2024

सायली संजीवच्या मेहेंदीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी म्हटले, ”लागा लग्नाच्या तयारीला मिसेस गायकवाड’

छोट्या पडद्यावरून चित्रपटात पदार्पण करण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते, अभिनयाच्या कसोटीला उतरावे लागते. पण काही अभिनेत्री अशा असतात की, त्या खूप कमी कालावधीत त्यांचा हा टप्पा पार करतात. याच यादीतील एक नाव म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सायलीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या हातावर कोणीतरी मेहेंदी काढताना दिसत आहे. फास्ट मोशनमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती साध्या वेशात दिसत आहे. या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओवरील कमेंट अधिक लक्षवेधी ठरत आहे. सायलीला मेहेंदी काढताना बघून अनेकजण ती लवकरच लग्न करणार आहे अशी चर्चा करत आहे. (Marathi actress sayali sanjeev share her video on social media)

तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या युझर्सपैकी सायलीचे चाहते टॉपला आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “मेहेंदी सुरू, लागा लग्नाच्या तयारीला,” तर आणखी एकाने कमेंट केली आहे की, “ऋतूच्या नावाची मेहेंदी काढत आहेस का?” यासोबत आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “करा की लगीन वाहिनीसाहेब.” तर आणखी एकाने “मिसेस ऋतुराज” अशी कमेंट केली आहे.

मागील अनेक दिवसापासून सायलीला क्रिकेटर ऋतुराज गायकवाड यांच्या नावाने ट्रोल केले जात आहे. परंतु अजूनही तिने याबाबत तिची कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच ऋतुराज आणि सायलीचा वाढदिवस ३१ जानेवारीला असतो त्यामुळे देखील सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे

सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायलीने कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम केले आहे. या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

हे देखील वाचा