Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुनची खास पोस्ट; पण करीनाच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या अभिनयाव्यतिरिक्त डान्स आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. शनिवारी (२३ ऑक्टोबर) मलायका आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी तिचे कुटुंब, चाहते आणि चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळी तिला शुभेच्छा देत आहेत. मात्र, तिला या सर्वांमध्ये खास व्यक्तीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो खास व्यक्ती म्हणजेच अर्जुन कपूर होय. अर्जुनने एक रोमँटिक फोटो शेअर करत मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खानच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. खरं तर, तिने तिचे श्रेय मागितले आहे.

मलायका आणि अर्जुनचे नाते कोणापासूनही लपलेले नाही. किंबहुना त्यांनाही आपले नाते लपवायचे नाही. अर्जुन आणि मलायका नेहमीच एकत्र वेळ घालवताना दिसतात. तसेच बॉलिवूडमधील मित्रमंडळी करीना कपूर खान, करण जोहर आणि बहीण अमृता अरोरासोबत पार्टीही करते. यावेळी अर्जुनने मलायकाच्या वाढदिवशी सुंदर शुभेच्छा दिल्या. त्याने अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी मला तुला फक्त हसताना पाहायचे आहे. यावर्षी तू जास्तीत जास्त हसावे, अशी प्रार्थना करतो.” (Actor Arjun Kapoor Wishes Malaika Arora Birthday With Beautifull Picture Kareena Kapoor Khan Reacted)

अर्जुनच्या या पोस्टवर मलायकाची मोठी बहीण अमृता आणि प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे करीनाने लिहिले की, “मला फोटोचे श्रेय पाहिजे, अर्जुन कपूर जी.” करीनाच्या या मागणीवर अर्जुननेही स्टोरीवर मजेशीर उत्तर दिले.

Photo Courtesy: Instagram/arjunkapoor

खरं तर, आयटम साँगने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मलायकाचा जन्म २३ ऑक्टोबर, १९७३ रोजी मुंबईत झाला होता. भारताच्या टॉप मॉडेल्सपैकी एक असलेल्या मलायकाने नव्वदच्या दशकात अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. शाहरुख खानसोबतच्या ‘छैया छैया’ या आयटम साँगने मलायकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले.

मलायका सध्या अनेक रिऍलिटी टीव्ही शोमध्ये पाहुण्या, तर कधी परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तिने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केले होते, बराच काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाजला एक मुलगाही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट

-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा